कोस्टलच्या दुसऱ्या बोगद्याचे 1 हजार मीटरचे टनेलिंग पूर्ण; यावर्षात

Coastal Road
Coastal RoadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील प्रवास वेगवान करणाऱ्या प्रकल्पामध्ये कोस्टल रोडच्या (Coastal Road) प्रकल्पात एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आता दुसऱ्या बाजूच्या बोगद्याने 1 हजार मीटरचे टनेलिंगचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. येत्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे 70 टक्के वेळेची बचत तर 30 टक्के पैशांची बचत होणार आहे.

Coastal Road
औरंगाबादकरांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा; 200 कोटींचा निधी

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहेत. यासाठी ‘मावळा’ या अवाढव्य यंत्राचा नियमितपणे वापर करण्यात येत असून २ बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम याच वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण झाले होते. तर दुसऱ्या बोगद्याचे तब्बल १ हजार मीटरचे खोदकाम २९ जुलै २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बोगद्यात आतापर्यंत ४९५ कंकणाकृती कडे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे.

Coastal Road
मुंबई मेट्रो-३ : सीप्झ ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा २०२४ मध्ये

सागरी किनारा मार्गासाठी महाबोगदे खणण्याच्या कार्याचा व यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'मावळा' हे यंत्र कार्यान्वित करण्याचा आरंभ ११ जानेवारी, २०२१ रोजी करण्यात आला होता. पहिल्या बोगद्याचे खोदकाम हे दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. त्यापाठोपाठच १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरु करण्यात आले. ही बाब लक्षात घेतल्यास केवळ ११९ दिवसात १ हजार मीटरचा टप्पा गाठत या कामाने सहस्रपूर्ती केली आहे. सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. हे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येत असून या यंत्राचे 'मावळा' असे नामकरण करण्यात आले आहे. हे यंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे.

Coastal Road
'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग' तंत्रज्ञानाची कमाल; कोस्टल रोड प्रकल्पात

दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत. दुसर्या बोगद्याचे खोदकाम हे साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणारा 'सागरी किनारा मार्ग' बांधल्यामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्‍क्‍यांची बचत होण्यासोबतच ३० टक्के इंधन बचत देखील साध्य होणार आहे. यामुळे अर्थातच पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com