टक्केवारीचे 'हात धुण्यासाठी' १६० कोटींच्या टनेल लॉंड्रीचा घाट?

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री (Tunnel Laundry) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या प्रशासकांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले 'हात धुवून' घेण्यासाठी असा आरोप केला जात आहे.

BMC
समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेत्याची 'ही' स्टंटबाजी कशासाठी?

भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका प्रशासक इकबाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. टनेल लाँड्रीचे कंत्राट काढण्यासाठी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करणार असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. कुठलेही तंत्रज्ञान, टेक्निकल स्पेसिफिकेशन किंवा अनुभव याविषयी यामध्ये कुठलीही एकसूत्रता नाही. सगळ्या गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला फायदा व्हावा या दृष्टीने फ्रेम करण्यात आल्या आहेत, असा आरोप देखील साटम यांनी केला आहे.

BMC
पुणेकरांसाठी गुड न्यूज; 'या' मार्गावर 3668 कोटींतून भुयारी मेट्रो

मुंबई महापालिकेकडून जेव्हा टेंडर काढले जाते, तेव्हा मुंबई महापालिका आणि सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार संबंधित कंपनीच्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जात असतो. मात्र, या मार्गदर्शक तत्वांना धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विदेशातील कंपन्यांचा मार्ग सुकर करण्यात आला असल्याचा दावा साटम यांनी केला आहे. ज्या रुग्णालयाच्या आवारात ही टनेल लाँड्री उभारण्याचे प्रस्तावित आहे. ते क्षयरोगाचे रुग्णालय आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे कपडे धुवून आणि सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणार नाही याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का, असा प्रश्न साटम यांनी उपस्थितीत केला आहे.

BMC
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला सुरुंग; 'हा' प्रकल्प गुंडाळणार

जंतूसंसर्गाच्या भीतीने आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल, तर भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा प्रश्न साटम यांनी उपस्थित केला आहे. ही टेंडर प्रक्रिया त्वरीत रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

रुग्णालयांमध्ये वापरलेले कपडे धुण्यासाठी सध्या महापालिकेकडून परेल येथील विद्युत धुलाई केंद्राचा वापर केला जात आहे. हे केंद्र महापालिकेच्या मालकीचे आहे. मात्र, या केंद्राची कार्यक्षमता कमी झाल्याने याठिकाणी सध्या ५० टक्के कपडे धुतले जात आहेत. तर, उर्वरीत कपडे खासगी लाँड्रीतून धुतले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com