Tendernama Exclusive : 'सार्वजनिक बांधकाम'ची किमया भारी; अडीच महिन्यानंतर अपात्र ठेकेदारालाच ठरविले पात्र

Solapur : अडीच महिन्यानंतर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ सोलापूर कार्यालयाला अचानक साक्षात्कार झाला आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या युनिक बिल्डर्स माळेगाव, अकलूज या ठेकेदाराला पात्र ठरवण्याची किमया केली आहे.
PWD Solapur
PWD SolapurTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD Solapur) सोलापूर कार्यालयाने मोहोळ (Mohol) तालुक्यातील एका पुलाच्या कामात मोठी अनियमितता केल्याचे उजेडात आले आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी-CVC) नियमांचे उघड उल्लंघन करून २० कोटी रुपयांच्या टेंडरसाठी (Tender) अपात्र ठरलेल्या युनिक बिल्डर्स माळेगाव, अकलूज या ठेकेदाराला (Contractor) तब्बल अडीच महिन्यानंतर पात्र ठरवण्यात आले आहे.

यासंदर्भात एल वन आलेल्या दुसऱ्या ठेकेदाराने हरकत नोंदवून सुद्धा त्याकडे आजअखेर काणाडोळा केला जात आहे. यामागे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ सोलापूर यांची भूमिका मोठी संशयास्पद असल्याचे दिसून येते.

PWD Solapur
मंत्रालयातील सचिवांच्या कार्यालयातील दलालांवर कारवाई करा; आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विभागाने मोहोळ तालुक्यातील (जि.सोलापूर) बार्शी मालवंडी मानेगाव नरखेड भोयरे हिंगणी भांबेवाडी शिरापूर रस्ता प्रतिमा २३ व भोगावती नदीवरील नरखेड गावाजवळ किलोमीटर ३८/८०० येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी टेंडर काढले आहे. तब्बल २० कोटी ५४ लाख रुपये खर्चाचे हे टेंडर आहे.

३० सप्टेंबर २०२४ पर्यंत या कामासाठी ई टेंडर सादर करायचे होते. ३ ऑक्टोबर रोजी टेंडर उघडल्यानंतर ७ ठेकेदार पात्र ठरले. पात्र ठेकेदारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७ पैकी व्ही टी पाटील, व्ही एस पी इन्फ्रास्ट्रक्चर, निखिल कन्स्ट्रक्शन आणि सागर कन्स्ट्रक्शन या ४ ठेकेदारांनी कागदपत्रे सादर केली. तर युनिक बिल्डर्स, टी अँड टी लिमिटेड व टी डी देशमुख या ठेकेदारांनी विहीत मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांना ८ ऑक्टोबर रोजी टेंडर प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले.

PWD Solapur
तब्बल तीनशे एकरवर वसणार तिसरी मुंबई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

या कामासाठी व्ही टी पाटील, व्ही एस पी इन्फ्रास्ट्रक्चर यांनी सर्वात कमी दराने टेंडर भरले. (अनुक्रमे एल वन आणि एल टू) व्ही टी पाटील या ठेकेदाराने टेंडर रक्कमेच्या ०.५५ टक्के कमी दराने तर व्ही एस पी इन्फ्रास्ट्रक्चरने ०.३० टक्के कमी दराने टेंडर भरले.

मात्र, तब्बल अडीच महिन्यानंतर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ सोलापूर कार्यालयाला अचानक साक्षात्कार झाला आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या युनिक बिल्डर्स माळेगाव, अकलूज या ठेकेदाराला पात्र ठरवण्याची किमया केली आहे. विभागाने २० डिसेंबर रोजी युनिक बिल्डर्सला तसे पत्र दिले आहे. या पत्रात बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास अपात्र ठरविले होते याची कबुली सुद्धा दिली आहे.

PWD Solapur
Devendra Fadnavis : मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास; स्वयं पुनर्विकासाच्या प्रीमियमचे व्याज 3 वर्षे माफ

यासंदर्भात इतर ठेकेदारांना काही आक्षेप असल्यास २३ डिसेंबरपर्यंत हरकत नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, व्ही टी पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या पात्र आणि एल वन आलेल्या ठेकेदाराकडून २३ डिसेंबर रोजी हरकत नोंदवण्यात आली. विभागाने युनिक बिल्डर्स या ठेकेदारास अचानकपणे पात्र ठरविल्याची बाब संशयास्पद आणि अनियमित असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मात्र, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ सोलापूर कार्यालयाने तेव्हापासून आजअखेर या अनुषंगाने कोणतीही कारवाई केलेली नाही. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो. आता हे प्रकरण कार्योत्तर मान्यतेसाठी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com