'माती गैरव्यवहार'मुळे कोणी खाल्ली माती?

Laluprasad Yadav

Laluprasad Yadav

Tendernama

बिहारचे अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या लालूप्रसाद यादव यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवरील मोठा नेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यश मिळविले होते. आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीमुळे लालू यांची लोकप्रियता देशभरात पोहचली होती. देशातील बिहारसारख्या मोठ्या राज्यावर मजबूत पकड असल्याने लालूंचा राष्ट्रीय राजकारणात चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. मात्र, चारा गैरव्यवहाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि त्यानंतर लालूंच्या बिहारमधील वर्चस्वाला हळूहळू सुरुंग लागला. या प्रकरणी आरोप झाल्यानंतर लालूंना मुख्यमंत्रिपदाचाही राजिनामा द्यावा लागला.

चारा गैरव्यवहाराने लालूंच्या प्रतिमेलाही मोठा तडा गेला. चारा गैरव्यवहाराचे प्रकरण चर्चेत लालूंचे इतरही कारनामे समोर येऊ लागले. लालूंवर अनेक आरोप झाले. त्यातील काही प्रकरणे बरीच गाजली, त्यांची चर्चाही देशभरात झाली.

Laluprasad Yadav

चारा गैरव्यवहाराने अशी संपविली लालूंची सद्दी

चारा गैरव्यवहारामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या बिहारमध्ये २०१७मध्ये माती गैरव्यवहारावरून राजकारण रंगले होते. या गैरव्यवहाराच्या केंद्रस्थानी ही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय होते. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूंविरोधात गैरव्यवहाराचे आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले होते.

बिहारची राजधानी पाटण्यात सर्वांत मोठ्या मॉलची निर्मिती करण्यात आली. त्याची मालकी "डिलाईट मार्केटिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड'कडे आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे तत्कालीन अध्यक्ष, लालूप्रसाद यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव, कनिष्ठ चिरंजीव आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तसेच लालूंची कन्या चंदा यादव यांचा समावेश होता.

या मॉलची सगळी मालकी अप्रत्यक्षरीत्या यादव कुटुंबीयांकडे आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सूरसंड येथील आमदार सय्यद अबू दौजाना यांची कंपनी "मेरिडीयन कन्स्ट्रक्‍शन (इंडिया) लिमिटेड'च्या माध्यमातून या शॉपिंग मॉलची निर्मिती केल्याचा आरोप सुशील मोदी यांनी केला. सुरवातीच्या टप्प्यात लालू यादव यांनीही याचा इन्कार केला नव्हता; पण भाजपने गैरव्यवहाराचे आरोप करताच लालूंना जाग आली आणि मग त्यांनी अंग झटकले.

Laluprasad Yadav

आदर्श घोटाळा अन् अशोक चव्हाणांना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद

"डिलाईट मार्केटिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तेजप्रताप, तेजस्वी आणि चंदा यादव यांना 20 जून 2014 मध्ये संचालक बनविण्यात आले होते. या मॉलचे सुशोभीकरण आणि अन्य बांधकामासाठी 90 लाख रुपयांची माती खरेदी करण्यात आली होती. हा खर्च पूर्णपणे अनावश्‍यक होता. आपल्या ताब्यात असलेल्या सरकारी विभागांच्या माध्यमातून यादव कुटुंबीयांनी आपल्याच मालकीच्या मॉलला मातीची विक्री केली. हा सगळा व्यवहार वन, पर्यावरण आणि उद्याननिर्मिती विभागाच्या देखरेखीखाली झाला. याची सर्व सूत्रे लालूप्रसाद यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांच्याकडे होती.

Laluprasad Yadav

'त्या' नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी अखेर कारवाई

या मातीच्या खरेदीसाठी पर्यावरण आणि वन विभागाने मोठ्या चतुराईने पाटण्यातील संजय गांधी जैविक उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा पुढे केला आणि केवळ कोटेशनच्या आधारावर 90 लाख रुपयांची माती खरेदी करण्यात आली. दरम्यान, संजय गांधी जैविक उद्यानाचे संचालक नंदलाल यांनी या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळून लावला होता. राज्य सरकारकडून केवळ 27 लाख रुपयांची माती खरेदी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com