म्हाडाच्या लॉटरीला बंपर प्रतिसाद! पहिल्याच दिवशी तब्बल चार हजार...

MHADA
MHADATendernama

पुणे, ता. ५ : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (MHADA Pune) पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत पाच हजार ९९० सदनिका विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला गुरुवारी सुरवात झाली. सायंकाळपर्यंत सुमारे चार हजार ४०० अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली.

MHADA
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मोहिमेस सुरवात झाली. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले ‘आयएचएलएमएस 2.0’ या नूतन संगणकीय ॲपचा वापर करून घरांसाठी अर्ज मागविणारे पुणे मंडळ हे म्हाडाचे राज्यातील पहिले मंडळ ठरले आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणी दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी आता पात्र अर्जदार ठरणार आहेत.

MHADA
1026 कोटींचा सिन्नर-शिर्डी चौपदरी मार्ग अंतिम टप्प्यात

पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अल्प, अत्यल्प आणि उच्च गटातील घरांच्या सोडत काढण्यात आली आहे. नागरीकांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर नागरीकांना नोंदणी करता येणार आहे.

MHADA
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील अडथळा दूर; बांधकामांवर बुलडोझर

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर पुस्तिका, व्हिडिओ, हेल्प फाइल आणि हेल्प साइट या वेबसाइटवर उपलब्ध केल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती जाणून घ्यावी. आज पहिल्या दिवशी चार हजार ४०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
- नितीन माने, मुख्य अधिकारी, म्हाडा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com