'या' नव्या उपायाने नवले पुलावरील अपघातांना लागणार फूलस्टॉप

Navale Bridge
Navale BridgeTendernama

नागपूर (Nagpur) : स्वामीनारायण मंदीर ते नवले पुलादरम्यान (Navale Bridge) वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उताराची तीव्रता कमी करण्यासाठी नऱ्हे जंक्शन ते नवले पूल यादरम्यान उड्डाणपूल बांधण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) विनंती करणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत सांगितले.

Navale Bridge
नाशिक मनपातील 'या' 2 विभागांत तब्बल 706 जागांची मोठी भरती

पुणे, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, वारजे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी (दरीपूल) बोगद्यामार्गे मुंबई-बंगळूर मार्गात गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, या ठिकाणी गेल्या आठ वर्षांमध्ये १८८हून अधिक अपघात झाले. त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असताना ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी निदर्शनास आणली.

Navale Bridge
महाराष्ट्राच्या 'लाइफलाइन'चा हा लक्झरिअस लूक पाहिलात का?

या अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे या परिसरातील असणारा तीव्र उतार. मात्र, प्रशासन तात्पुरते उपाय करते. काही ठिकाणी सेवा रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गवरून प्रवास करावा लागतो. यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना म्हणून मुख्य उतार कमी करणे, स्वामिनारायण मंदिर ते दरीपूल यामधील तीव्र वळण कमी करणे, सर्व्हिस रस्ते सलग तयार करून रुंद करणे, दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे, अनधिकृत होर्डिंग काढणे, रिंगरोड तयार करून वाहतूक शहराबाहेरून वळविणे, वारजे ते नवले पूल, नवले पूल ते कात्रजदरम्यान सर्व्हिस रस्ता करणे आदी मुद्दे तापकीर यांनी मांडले.

Navale Bridge
मुंबईतील SRA प्रकल्पांसंदर्भात मोठी घोषणा; काय म्हणाले फडणवीस?

यावर उत्तर देताना हा रस्ता कात्रज बोगदा ते दरीपूल पुणे बायपास रस्ता असून, हा मोठा उड्डाणपूल झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा प्रस्ताव पाठविला जाईल. हा उड्डाणपूल झाल्यास अपघात टळून वाहतूक कोंडी सुटणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी विनंती केली जाणार आहे. तसेच सेवा रस्ते ज्या ठिकाणी नसतील व ‘डीपी’च्या रस्त्यांना ज्या अडचणी असतील, त्या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या संबंधितांना सूचना करून तातडीची कार्यवाही करण्यास सांगण्यात येणार, असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com