नाशिक मनपातील 'या' 2 विभागांत तब्बल 706 जागांची मोठी भरती

Job Alert
Job AlertTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन - IBPS) या संस्थेशी आठवडाभरातच करार होऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Job Alert
घरकुल परत जाऊ नये म्हणून 'या' ग्रामपंचायतीने काय केले पाहा

नाशिक महापालिकेने १४,००० पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला. मात्र, तो मंजूर करण्यास सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटी कारणीभूत ठरत आहेत. मात्र, आवश्यक सेवेसाठी मनुष्यबळ गरजेचे असल्याने राज्य शासनाने आरोग्य व अग्निशमन दलातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही विभागातील सेवाशर्ती नियमातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने शासनाला प्रस्ताव सादर केला.

Job Alert
समृद्धीवरून प्रवास करणाऱ्यांचे आठवड्यातच वाचले ५० कोटी कारण...

दरम्यान राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील पदे भरण्यास मान्यता दिली. तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांच्या माध्यमातून करण्याच्या स्पष्ट सूचना दिली होती. तसेच अग्निशमन विभागातील ३४८, तर आरोग्य व वैद्यकीय विभागातील अशा ७०६ पदांसाठी मंजूर सेवा प्रवेश नियमावलीनुसार पदांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Job Alert
नगर-मराठवाड्याने का ठोकलाय नाशिक विरुद्ध शड्डू? नेमका काय आहे वाद?

सरकारने टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस ( टीसीएस) व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ( आयबीपीएस) या दोन संस्थापैकी एका संस्थेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. नाशिक महापालिकेने शासनानिर्णय प्राप्त झाल्यानंतर नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी या दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले. आयबीपीएस या संस्थेकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर लागलीच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयबीपीएस संस्थेला पाचारण करण्यात येणार असल्याचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी सांगितले.

Job Alert
औरंगाबाद : 'त्या' पुलाचे सदोष डिझाइन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

विविध पदांच्या भरतीसाठी अर्जनिहाय आकारण्यात येणाऱ्या शुल्क निश्चितीसाठी तसेच संबधित संस्थेसोबत सामंजस्य करण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बोलावण्यात आले आहे, असे प्रशासन विभागातर्फे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com