पुणेकरांसाठी खुशखबर! बोपोडी ते वाकडेवाडी बसने प्रवास करा वेगवान

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : बोपोडी ते वाकडेवाडी दरम्यान पीएमपीच्या बसचा प्रवास आता वेगवान होणार आहे. कारण, या मार्गावर पुणे महापालिका बीआरटी मार्ग करणार आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीएमपीचा हा नववा बीआरटी मार्ग असून त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

Pune
कंत्राटफेम आमदाराचे 'लाड' पुरवतेय कोण?750कोटीच्या टेंडरचा 'प्रसाद'

प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी शहरातील गर्दीच्या मार्गांवर ‘बीआरटी’ मार्ग सुरु केले आहेत. आता शहराच्या सात मार्गांवर बीआरटी आहे. काही मार्गांवरील बीआरटी चांगल्या स्थितीत आहे तर काहींची दुरवस्था झाली आहे. हडपसर मार्गावरची बीआरटी बंद अवस्थेत आहे. तर मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील दोन ते तीन थांबे बंद आहेत. उर्वरित बीआरटीमधून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. पुणे व पिंपरी चिंचवडच्या बीआरटीमधून दररोज ६७४ बस धावतात. यातून रोज सुमारे सव्वाचार लाख प्रवाशांची वाहतूक होते.

Pune
EXCLUSIVE: सरकारमधील 25 आमदारांना हवेत 1200 कोटींचे टेंडर

बोपोडी ते वाकडेवाडी बीआरटी मार्ग :
५ किमी - अंतर
११ - बस थांबे
१३ मिनिटे - नॉन बीआरटी बसचा वेळ
६ मिनिटे - बीआरटी बसचा वेळ
७ मिनिटे - वेळेची बचत
८० कोटी रुपये - अपेक्षित खर्च
२८९ - पीएमपीची संख्या
१६२६ - दिवसभरातील फेऱ्या

पीएमपीचे बीआरटी मार्ग....

१) नाशिक फाटा ते वाकड
२) निगडी ते दापोडी
३) सांगवी फाटा ते किवळे
४) संगमवाडी ते विश्रांतवाडी
५) येरवडा ते वाघोली
६) काळेवाडी फाटा ते चिखली
७) स्वारगेट ते कात्रज

‘बीआरटी’चा रोजचा प्रवास
६७४ - बीआरटीमधून धावणाऱ्या बस
६४ किलोमीटर - एकूण अंतर
११७ - एकूण बस थांबे
११८ - एकूण मार्ग
८२१५ - दिवसभरातील फेऱ्या
४ लाख २६ हजार - रोजची प्रवासी संख्या
१ लाख ५७ हजार ६६१ किमी - पीएमपी बसचा प्रवास
७० लाख रुपये - दैनंदिन उत्पन्न

Pune
पुणे पालिकेचे खटक्यावर बोट! एवढं पेमेंट करा अन् खुशाल फ्लेक्स लावा

बीआरटी का महत्त्वाची?
पीएमपीच्या रोज सुमारे १६५० बस धावतात. प्रत्येक बस किमान २२५ किमी धावते. सर्व बस एक दिवसांत सुमारे ३ लाख ६० हजार किमीचा प्रवास करते. बसचा सरासरी वेग हा ताशी १३ किमी आहे. बीआरटीमधून धावणाऱ्या बसचा वेग सरासरी २६ किमी आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या बसच्या तुलनेत बीआरटीमधून धावणाऱ्या बसचा वेग दुप्पट आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होते. तर दुसरीकडे कमी बसच्या संख्येत देखील जास्तीच्या फेऱ्या देणे शक्य होते. त्यामुळे बीआरटी प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरते.

दिघी ते आळंदी मार्ग उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत :
पिंपरी चिंचवड महापालिकेने दिघी ते आळंदी दरम्यान सहा किमीचा बीआरटी मार्ग तयार केला. या मार्गावर नऊ थांबे आहेत. या मार्गाजवळील रस्त्यावरून दिवसभरात १४४ बसच्या माध्यमातून १६०० फेऱ्या होतात. मात्र, हा मार्ग गेल्या वर्षापासून उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा पीएमपीचा आठवा बीआरटी मार्ग आहे. तो सुरु झाला तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत किमान १५ मिनिटांची बचत होईल. याचा थेट फायदा दीड लाख प्रवाशांना होईल.

बोपोडी ते वाकडेवाडी दरम्यान पुणे महापालिका बीआरटी मार्ग बांधणार आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला देखील सुरवात झाली असून यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com