पुणे रिंगरोडच्या पहिल्या टप्प्याने 'या' मार्गावरील कोंडी फुटणार

Ring Road
Ring RoadTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुणे-मुंबई महामार्ग व नगर रस्ता यांना जोडणाऱ्या सोलू ते वाघोली दरम्यानच्या रिंगरोडचे काम पहिल्या टप्प्यात पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतले आहे. त्यामध्ये सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यानचा मार्ग प्राधिकरण, तर लोहगाव-वाघोली आणि वडगाव शिंदे या दरम्यानचा मार्ग पुणे महापालिकेकडून विकसित करण्यात येणार आहे.

Ring Road
सुशोभीकरणाच्या ३० कोटींच्या टेंडरमध्ये घोटाळा; ठेकेदारास पायघड्या?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई महामार्ग ते नगर रस्ता या दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगरहून मुंबईकडे जाणारी अथवा मुंबईवरून नगरकडे जाणारी वाहने पुणे शहरात न येता रिंगरोडच्या माध्यमातून परस्पर जातील, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ring Road
पुणे स्टेशनची गर्दी कमी होणार; हडपसरला आता रेल्वे टर्मिनल

सोलू ते वडगाव शिंदे या दरम्यान साडेसहा किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. तर लोहगाव- वाघोली आणि वडगाव शिंदे हे साडेपाच किलोमीटरचा मार्ग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्या मार्गाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्पाईन रोडपासून पठारे चौक, चऱ्होली ते निगडी व पुणे मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या ३० मीटर रूंदीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हिंजवडी रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून वाघोली, लोहगाव, आळंदी, मोशी, निगडी, पुनावळे ते हिंजवडी असा रस्ता तयार होणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com