G-20 परिषदेमुळे पुणेकरांच्या गाड्या धावणार गुळगुळीत रस्त्यांवरून

Road
RoadTendernama

पुणे (Pune) : शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १८० कोटींची टेंडर प्रक्रिया सुरू असताना, आणखी काही रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यात ३८ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १४२ कोटींचा निधी अंदाज समितीमध्ये मंजूर केला आहे. पुण्यात २०२३ मध्ये ‘जी-२०’ आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्याची काय तयारी झाली आहे, हे पाहण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जानेवारीत पुण्यात येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने शहर चकाचक करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

Road
बुलेट ट्रेन रखडण्यास 'गोदरेज'च जबाबदार; सरकारचा पुन्हा निशाणा

सद्यःस्थिती काय?
- गेल्या दोन वर्षांत समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी, मोबाईल केबल अशा आदी कारणांसाठी रस्त्यांवर वारंवार खोदकाम
- खोदकामातील खड्डे सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून बुजविले, मात्र काम व्यवस्थित न झाल्याने रस्ते खचले
- खचलेल्या ठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत
- शिवाय शहरात वाहतूक कोंडीची समस्याही कायम
- पुणेकरांच्या संतापानंतर महापालिका अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई
- असे असूनही रस्त्यांची स्थिती अद्यापही खराबच

आता काय होणार?
- ‘जी-२०’ परिषदेमुळे महापालिका प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करणार
- सिमेंटच्या रस्त्यांवर सहा इंचाचा थर टाकणार
- सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५०० कोटींचा खर्च अपेक्षित
- सर्वात खराब झालेल्या रस्त्यांना प्राधान्य देणार
- पहिल्या टप्प्यात ५० किमीच्या रस्त्यांसाठी १९३ कोटींची निविदा प्रक्रिया सुरू
- येत्या आठवड्यात निविदा उघडणार
- दुसऱ्या टप्प्यातील ९८ किमी लांबीच्या रस्त्यांसाठी २६० कोटींचा खर्च

Road
Nashik: गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढा अन्यथा शुक्रवार पासून...

आयुक्तांच्या बैठकीत काय झाले?
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात त्यांनी प्रमुख रस्त्यांची यादी व खर्च सादर करण्याचे आदेश पथ विभागाला दिले. त्यानुसार ३० किमीच्या ३४ रस्त्यांचा समावेश केला आहे. यामध्‍ये धायरी, कोथरूड, औंध, कात्रज, हडपसर, नगर रस्ता यासह शहराच्या सर्व भागातील रस्ते आहेत. या कामासाठी १३० कोटींचा खर्च येणार आहे, तर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ७.८ किमीचे रस्ते आहेत, त्यासाठी १२ कोटींच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.

५० रस्त्यांसाठी तीन ठेकेदार
पहिल्या टप्प्यात महापालिकेने ५० किमी लांबीच्या ५७ रस्त्यांसाठी १९३ कोटींचे टेंडर काढले आहे. इतरवेळी महापालिका प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र टेंडर काढते, पण यावेळी ५० किमीचे तीन पॅकेज केले आहेत. २९, १४ आणि सात किमीचे सिमेंट रस्ते असे तीन टेंडर काढले आहेत. त्यामुळे ५० रस्त्यांचे काम तीन ठेकेदारांकडून केले जाणार आहे. मोठे ठेकेदार आल्याने चांगल्या दर्जाचे काम होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com