PMP: बस ठेकेदारांचे लाड थांबविण्यासाठी बकोरियांचा मोठा निर्णय!

Omprakash Bakoria
Omprakash BakoriaTendernama

पुणे (Pune) : आर्थिक तोट्यातून प्रवास करणाऱ्या पीएमपी (PMP) प्रशासनाने ठेकेदारांच्या (Contractors) बसवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पीएमपी पहिल्या टप्प्यात स्वतःच्या मालकीच्या १०० नवीन बसची खरेदी करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेशी चर्चा करून सर्वांत कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून अर्थसाहाय्य घेतले जाणार आहे. नवीन बस खरेदी करताना ६० बस या इलेक्ट्रिक, तर ४० बस सीएनजीवरील असतील. बस खरेदीसाठी रोजच्या उत्पन्नात तीन ते पाच लाख रुपयांची वाढ होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले आहेत.

Omprakash Bakoria
रिलायन्सकडून गुड न्यूज! नाशिकच्या अक्राळे एमआयडीसीत मोठी गुंतवणूक

पीएमपीचे रोजचे उत्पन्न दीड कोटींहून जास्त आहे. असे असले तरीही सर्वांत जास्त खर्च हा ठेकेदारांच्या बसवरील बिलापोटी होत आहे. यामुळे पीएमपीच्या तोट्यात वाढ होत आहे. पीएमपीचा संचित तोटा सध्या ७६१ कोटी इतका झाला आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांच्या बसचा कमी वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी स्वतःच्या मालकीच्या १०० बसची खरेदी केली जाणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय होणार आहे.

Omprakash Bakoria
पुणे विमानतळावरील पार्किंगची कटकट संपली; घरातूनच अशी करा जागा बूक

ठेकेदारांना रोज एक कोटी
पीएमपीच्या ताफ्यात पीएमपीच्या मालकीच्या बसपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे. सुमारे ९०० बस या सहा ठेकेदारांच्या आहेत. त्यांना बिलापोटी रोज सुमारे ९० लाख ते एक कोटी रुपये पीएमपी देते. पीएमपीच्या उत्पन्नाच्या तुलनेत हा खर्च अधिक असल्याने तोट्यात वाढ होत आहे.

Omprakash Bakoria
जीव मुठीत घेऊन करावा लागतोय चांदणी चौकातून प्रवास; कारण...

ठेकेदारांच्या बसवर पीएमपीचे असलेले अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीएमपी स्वतःच्या मालकीच्या बसच्या संख्येत वाढ करणार आहे. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहे. लवकरच बसची खरेदी केली जाईल.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com