पुणे रिंगरोडचा 'खेळ'च; सल्लागारावर खर्च केलेले 'एवढे' कोटी पाण्यात

Ring Road
Ring RoadTendernama

पिंपरी (Pimpri) : पुण्याच्या विकासाला चालना देणारा व नागरिकांची जीवन वाहिनी असणाऱ्या पुणे रिंगरोडमध्ये (Pune RingRoad) वारंवार फेरबदल होऊन सध्या ११० मीटर रूंदीऐवजी ६५ मीटर रुंदीचा प्रस्तावित केला आहे. यामुळे पहिल्या आराखड्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सल्लागारावर केलेला पाच कोटी ७९ कोटी रुपये खर्च पाण्यात गेला आहे. तर, नव्याने होणाऱ्या रिंगरोड आराखड्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी ९४ लाखांची नव्याने टेंडर काढले आहे. सध्या ८८.०८ किलोमीटरपैकी रिंगरोडचा पहिला ४.५ किलोमीटरचा टप्पा ‘पीएमआरडीए’ हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ring Road
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

पुणे जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजनेच्या १९९७ च्या अधिसूचनेनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर व अंशत: हद्दीत ९० मीटर रिंगरोड प्रस्तावित केला होता. त्यानंतर, पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीलगत १० किलोमीटर क्षेत्रात नव्याने रस्त्याचे जाळे होणार असल्याने ती अधिसूचना २०१३ ला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, पुन्हा २०१७च्या अधिसूचनेद्वारे ११० मीटर रिंगरोडसाठी मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत तीन अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर, रिंगरोडमध्ये वारंवार भूसंपादनानुसार फेरबदल सुरुच आहेत. प्रत्यक्षात रिंगरोड साकारण्यास आणखी किती वर्षे प्रतिक्षा करावी लागणार? याचा अंदाज प्रशासनाला देखील नाही.

Ring Road
औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण 4 महिन्यांची प्रतिक्षा; 490 कोटींचे टेंडर

सद्य परिस्थितीनुसार इनर रिंगरोडच्या एकूण १२८.०८ किलोमीटर लांबीपैकी परंदवाडी इंटरचेंज ते उर्से ते सोलू हा सामाईक ४० किलोमीटर लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला आहे. प्राधिकरणातील पुणे इनर रिंगरोडच्या लांबीतील वाघोली-लोहगाव- वडगाव शिंदे-निरगुडी इतक्या ६.१९ किलोमीटरला पुणे महापालिकेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. उर्वरित ८८.०८ किलोमीटर लांबीसाठी व ११० मीटर रुंदीएवजी ६५ मीटर रुंदी प्रस्तावित असून उर्वरित प्रस्ताव २१ जून २०२१ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्यावरही हरकती व सूचना मागविल्या आहेत. वास्तविक जुन्या सल्लागारानेच विकास आराखडा तयार केला असून हे काम पुन्हा त्याच सल्लागाराकडे सोपविणे शक्य असतानाही ‘पीएमआरडीए’ प्रशासन जनतेच्या करुरुपी पैशांचा चुराडा करत असल्याचे दिसत आहे.

Ring Road
पुणे-नाशिक महामार्गावर टोलची दरवाढ; आता मोजावे लागणार...

रिंगरोड प्रकल्पाची माहिती :
एकूण लांबी : ८१.८९ किमी
एकूण रुंदी : ६५. मीटर
रेल्वे उड्डाणपूल : २
बोगदे : ५
पुलांची संख्या : १५

रिंगरोडचे टप्पे
टप्पे लांबी भूसंपादन क्षेत्र
१. सोलू इंटरचेंज ते वडगाव शिंदे निरगुडी ४.८० ३१.२०
२. पुणे अहमदनगर रस्ता ते पुणे सोलापूर ११.०६ ७१.८९
३. पुणे सोलापूर रस्ता ते पुणे सातारा २१.२३ १३८.००
४. पुणे सातारा रस्ता ते परंदवाडी इंटरचेंज ४४.८० २९१.२९
एकूण ८१.८९ ५३२.२९

रिंगरोड विकास आराखड्याची नवीन निविदा काढला आहे. नव्या आराखड्यानुसार प्रकल्प अहवाल आल्यानंतर जागा उपलब्धतेनुसार रिंगरोड समजेल. जुना डीपीआर प्राथमिक स्वरुपात भूसंपादनासाठी उपयोगी पडेल. आत्ताची निविदा ९८ लाखांची आहे. वर्क ऑर्डर पुढील आठवड्यात दिली जाईल. नवीन आराखड्यात अलाईनमेंट, क्रॉस सेक्शन, भूसंपादन, रिंगरोडची किंमत यात बदल होणार आहेत. ११० मीटरचा रिंगरोड असल्याने त्यावेळी आयआयसी टेक्नॉलॉजी मोनार्च कन्सल्टंट नेमणूक केली होती. ५.७९ कोटीमधून ४.४४ कोटी खर्च झाले आहेत. त्यांनी पूर्ण डीपीआर करुन दिला होता. आता नव्याने पुन्हा करावा लागणार आहे. १.३५ कोटी शिल्लक आहेत. परंतु, ९४ लाखात टेंडरची ऑफर मिळाली आहे. मेट्रो कॅरिडॉरही ३० मीटरवरुन ५ मीटरचा झाला आहे.
- विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

नव्याने रुजू झाल्यामुळे मी कामकाजाचा आढावाच घेत आहे. नव्याने रिंगरोड विकास आराखड्याची निविदा काढली आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुसार लवकरच कामकाज सुरु होइल.
- अशोक भालकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com