महापालिकेच्या ई-बाईक पुण्यातील कोंडी फोडणार का? असा होणार वापर...

E Bike
E BikeTendernama

पुणे (Pune) : पुण्यातील वाहतूक कोंडीने (Pune Traffic) पुणेकरांचे कंबरडे मोडलेले असताना पालिका (PMC) मात्र झोपल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असली तरी त्या दिशेने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे पुणेकरांना आलेला प्रत्येक दिवस वाहतूक कोंडीत जातो आहे. आता या कोंडीवर पालिकेने नवा उपाय शोधला असून, पुणेकरांना ई-बाईक (E-Bike) भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भाडेतत्वावर सायकली उपलब्ध करून देण्याच्या पालिकेच्या प्रयोगाचे पुढे काय झाले हे सर्वज्ञात असताना आता ई-बाईकच्या पर्यायाने पुणेकरांचा प्रवास थोडाफार तरी सुसह्य होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

E Bike
मुंबई, पुणे पाठोपाठ 'या' शहरातही धावणार ऑलेक्ट्राच्या इलेक्टिक बस

गेली अनेक महिने ई बाईक भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये प्रलंबित होता. अखेर स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पूर्वी ५०० ठिकाणांवर ई बाईक स्टेशन केले जाणार होते. पण पहिल्या टप्प्यात २५० स्टेशन उभारणीस मान्यता दिली आहे. पुढील सहा महिन्यांत यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा निर्माण करून पुणेकरांच्या सेवेत ही ई बाईक सेवा येणार आहे.

E Bike
'लम्पी'साठी सरकार सरसावले; 873 पशुधन पर्यवेक्षक भरतीसाठी टेंडर

पुणे महापालिकेने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पीएमपीच्या ताफ्यातून डिझेल बसेस हद्दपार करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात नागरिकांनी पेट्रोल, डिझेलवरील वाहने कमी वापरावीत शहरात फिरण्यासाठी ई बाईक भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी महापालिकेला सर्वाधिक फायदा व नागरिकांना कमी दरात सेवा देऊ शकणाऱ्या व्हिट्रो कंपनीचा प्रस्ताव मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीपुढे सादर केला होता. यामध्ये ७८० जागी चार्जिंग स्टेशन उभारणे, त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही या कंपनीला दिले आहेत. त्यासाठी आकाशचिन्ह विभागातर्फे वर्षाला २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारले जाणार आहे.

E Bike
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याबाबत मोठा निर्णय; NHAI आता...

ही कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी तीन लाख रुपये आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला दिला जाणार आहे. या जागा पुढील ३० वर्षांसाठी दिली जावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला. पहिल्या टप्प्यात ७८० जागांपैकी ५०० जागा कंपनीला द्याव्यात, त्यापैकी २०० ठिकाणीच चार्जिंग स्टेशन लावली जातील, असा दावा प्रशासनातर्फे केला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडल्यानंतर नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेवर प्रशासक आल्यानंतरही त्यावर लगेच निर्णय झाला नाही.

E Bike
रेल्वे तिकिटांसाठीची कटकट संपली; आता 'हे' अॅप डाउनलोड करा अन्...

शहरात ई बाईक भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा प्रस्ताव मान्य केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी या बाईक भाडेतत्त्वावर मिळतील. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. कंपनीकडून ५०० जागांची मागणी केली होती, पण ती अद्याप मान्य केली नाही. पुढील सहा महिन्यात कंपनीकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील, त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com