रेल्वे तिकिटांसाठीची कटकट संपली; आता 'हे' अॅप डाउनलोड करा अन्...

UTS mobile App
UTS mobile AppTendernama

पुणे (Pune) : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) आता प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही. कारण, प्रवाशांना आपल्या मोबाईलवरच क्यूआर कोडद्वारे तिकीट मिळत आहे. हे तिकीट पेपरलेस (Paperless) असल्याने कागदाचीही बचत होणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना यूटीएस मोबाईल तिकिटिंग हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. (UTS Mobile Ticketing App)

UTS mobile App
हार्बर रेल्वेमार्गावरून प्रवास करणारांसाठी गुड न्यूज; ३५०० कोटी..

पुणे रेल्वे स्थानकावर लोकलच्या तिकिटासाठी व मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरल तिकिटासाठी नेहमीच मोठी रांग लागलेली असते. यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. पुणे स्थानकावर तिकीट खिडकीवरून व एटीव्हीएमवरून प्रवाशांना जनरल तिकीट मिळते. यात सर्वाधिक गर्दी तिकीट खिडकीवर असते. अनेकदा एटीव्हीएम मशिनमध्ये बिघाड होतो तर कधी तिथे रेंजची अडचण आल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यात अडचणी येतात. क्यूआर कोडवरून तिकीट काढताना याची अडचण येणार नाही, याची काळजी घेतली आहे. जनरल तिकीट केंद्राजवळ क्यूआर कोडचे बॅनर लावण्यात आले आहे.

UTS mobile App
नाशिक मनपाने काय दिला 'जलसंपदा'ला प्रस्ताव?

पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, मळवली आदी स्थानकांवर देखील क्यूआर कोडने तिकीट काढण्याची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com