Talegaon chakan shikrapur road
Talegaon chakan shikrapur roadTendernama

नितीन गडकरींचे 'हे' आश्वासन प्रत्यक्षात येणार का?

Published on

पुणे (Pune) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून, त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यात येईल, त्यासाठीचे टेंडरही लवकरच काढण्यात येणार असल्याचे अश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्याची माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी दिली. (Talegaon-Chakan-Shikrapur National Highway)

Talegaon chakan shikrapur road
दिव्यांग फ्रेंडली फूटपाथ:चेंबूरमध्ये पायलट प्रोजेक्ट, 17 कोटींचे..

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय राजमार्ग ५४८ -डी म्हणून घोषित केला होता. एनएचआयएने मार्गाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, जमीन अधिग्रहित झाली नाही. त्यामुळे ३ जुलै २०२० मध्ये या कामाला वाइरल पेंडिंग प्रोजेक्टमध्ये सहभागी केले. त्यामुळे त्याचे काम बंद झाले आहे. या मार्गाचे काम रखडल्याने त्याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसतो आहे.

Talegaon chakan shikrapur road
मोठा दिलासा! देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार; लवकरच...

चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५४ किलोमीटर लांब राष्ट्रीय राजमार्गाला बोरीपरधी खंडात सहभागी करावे. त्यासाठी निधीची तरतूद करावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी गडकरी यांच्याकडे केली. त्यावर या महामार्गाच्या कामाचे टेंडर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले.

Tendernama
www.tendernama.com