पुणे-बेंगळुरू 'ग्रीनफिल्ड'मुळे प्रवास ५ तासांनी कमी; विमानासाठीही

Road
RoadTendernama

पुणे (Pune) : पुणे-बेंगळुरू (Pune-Bangalore) ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांतील अंतर ९५ किमीने कमी होणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरण्यासाठी पाच किमी लांबीची दोन एअर स्ट्रीप देखील असणार आहे. तसेच ‘वे. साइड’ सुविधांमुळे महामार्गाच्या बाजूलाच चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क, हॉटेल अशा सुविधा असतील. महामार्गाच्या दुतर्फा मोठी झाडे देखील लावली जाणार आहे. एअर स्ट्रीप असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असेल.

Road
शिंदे सरकारचा आणखी एक दणका; जलसंपदाच्या ३,८५८ कोटींच्या कामांना

देशांतील निवडक मार्गावर ‘भारतमाला’ परियोजना दोन अंतर्गत जवळपास तीन हजार किमीचे रस्ते बांधले जात आहे. हे सर्व रस्ते ग्रीनफिल्ड असतील. यात पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील डीपीआरचे काम येत्या काही दिवसांत संपणार आहे. येत्या काही महिन्यांत कर्नाटक राज्यात सुरु असलेले काम देखील संपण्याची शक्यता आहे.

Road
सत्ताबदल होताच बुलेट ट्रेनचे टेंडर सुसाट; साडेचार वर्षांतच...

ग्रीनफिल्ड म्हणजे काय ?

ग्रीनफिल्ड कॉरिडॉर हा पूर्णतः नवीन द्रुतगती मार्ग असणार आहे. जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण यात केले जात नाही. हे पूर्णतः नवीन मार्ग आहे. यावरून वाहने ताशी १२० किमी वेगाने धावतील. चार,सहा व आठ पदरी असतात. प्रदूषण कमी व्हावे या करिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी असेल.

कसा आहे पुणे-बेंगळुरू प्रकल्प?

१. वारवे बुद्रुकपासून ग्रीनफिल्ड सुरू

२. सहा लेन

३. संपूर्ण रस्ता डांबरी. सिमेंटचा वापर नाही.

४. १०० मीटर रुंदी (पुणे-मुंबई द्रुतगती मार्गापेक्षा मोठा)

५. ७४५ किमीचा मार्ग (आताचा मार्ग ८४० किमी)

६. सांगली, सातारा, कोल्हापूर यासह अन्य शहरातून हा मार्ग थेट जाणार नाही.

७. वाहतूक कोंडीचा फटका बसणार नाही

८. ताशी १२० किमी वेग अवघ्या सात ते आठ तासांत बंगळूरला पोचता येईल (आता ११ ते १२ तासांचा वेळ लागतो)

८. टोल स्टेशन वरून जवळच्या गावांना जाण्यासाठी रस्ता असेल

९. एक्ससेस कंट्रोलमुळे रस्त्यावरील वाहने थेट महामार्गावर येऊ शकणार नाही. परिणामी अपघात, वाहतूक कोंडी टळेल

१०. वाहतूक बाधित न होता आपत्कालीन परिस्थिती विमान थेट महामार्गावर उतरविण्यासाठी पुणे व बेंगळुरू जवळ पाच किमीची एयरस्ट्रीप असणार

११. एकूण प्रकल्पासाठी सुमारे ३१ हजार कोटींचा खर्च

प्रस्तावित पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संपताच जमीन अधिग्रहणाचे काम होईल. मगच प्रत्यक्षात कामाला सुरवात होईल. या मार्गावर प्रवाशांना विविध सुविधा मिळतील. प्रवास वेगवान व सुरक्षित होईल.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com