Garbage
GarbageTendernama

ठेकेदार बदलला अन् कचरा साठू लागला; चर्चा ठेकेदाराचीच...

सातारा (Satara) : शहरातील कचरा संकलनाचे काम करणारा ठेकेदार बदला‍चा परिणाम शहर व परिसरातील सफाई आणि इतर बाबींवर झाल्‍याचे दिसून येते. ठेकेदाराबरोबरच कामाच्‍या बदललेल्‍या ताळतंत्रामुळे नागरिक हैराण आहेत. कचरा साठवायचा किती आणि कुठे? असा प्रश्‍‍न त्‍यांना पडू लागला आहे.

Garbage
जलसंधारणमध्ये बदल्यांचे गँगवॉर; थेट उच्चपदस्थांच्या खुर्चीलाच हात?

शहर आणि परिसरातील कचरा संकलनाचा ठेका पालिकेच्‍या वतीने एका ठेकेदारास देण्‍यात आला होता. त्या ठेक्‍याची मुदत संपल्‍यानंतर ठेकेदार बदलण्‍याची प्रक्रिया पालिकास्‍तरावर सुरू होती. यासाठीच्‍या प्रशासकीय प्रक्रियेस वेळ लागत असल्‍याने पालिकेने पूर्वीच्‍याच ठेकेदाराच्‍या मदतीने कचरा संकलन सुरू ठेवले होते. ठेक्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ते काम सद्य:स्‍थितीत पुणे येथील नवीन ठेकेदारास मिळाले आहे. हे काम करण्‍यासाठीचे वेळापत्रक अद्यापही तयार न झाल्‍याने शहर आणि परिसरातील घराघरांत कचऱ्याचे ढीग जमले आहेत.

Garbage
मुंबईतील १८,६४८ खड्डे भरण्यासाठी महापालिकेचे २५ कोटींचे टेंडर

घंटागाडीच फिरकत नसल्‍याने साठलेल्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावायची कशी व कोठे? या चिंतेने नागरिक त्रासले आहेत. कोणत्‍या भागात किती घंटागाड्या, ट्रॅक्‍टर द्यायचे तसेच त्‍यासाठीची वेळ कोणती असावी, याचे वेळापत्रक तयार झाले नसल्‍याने कचरा संकलनाचे काम रखडल्‍याची माहिती पालिकेतून मिळत आहे. ठेकेदार बदलल्‍यानंतर शुक्रवारी तब्‍बल पाच दिवसांनी शाहूपुरी आणि परिसरातील कचरा संकलनासाठी छोटी घंटागाडी आली. या घंटागाडीची साठवण क्षमता संपल्‍याने अर्ध्या भागातील कचरा संकलन झाल्‍यानंतर ती डेपोकडे मार्गस्‍थ झाली. ठेकेदार बदलल्‍यानंतर कचरा संकलनाचे ताळतंत्र बिघडले असून, ते सुरळीत करण्‍यासाठी पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे.

Garbage
राज्यातील 'या' ५ जुन्या धरणांतील काढणार गाळ; दोन महिन्यात टेंडर

सातारी ठेकेदाराची चर्चा...

नामधारी असणाऱ्याच्‍या आडून साताऱ्यातीलच काही जण ठेका चालवत असल्‍याचीही चर्चा पालिका वर्तुळात आहे. या सातारी ठेकेदारांनी शहर आणि परिसरातील काही भागांत आरोग्‍य विभागाच्‍या हस्‍तकांसमवेत फेरफटका मारल्‍याची माहिती मिळते. सातारी ठेकेदारांमुळे वेळापत्रक तयार होण्‍यात अडचणी येत असल्‍याचे समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com