मुंबई मेट्रो ३ मार्गावरील भुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर बुधवारी ४२ वा व प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ७६.६% काम पूर्ण झाले आहे.

Mumbai Metro
ठरलं तर! पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' दिवशी 'समृद्धी'चे लोकार्पण

मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले.

Mumbai Metro
अखेर अदानींनी जिंकलं!; मुंबईतील 'ते' ५ हजार कोटींचे टेंडर खिशात

“मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते”, असे मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

Mumbai Metro
नाशिक-मुंबई सहापदरीकरणासाठी ७०० कोटी; गडकरींच्या हस्ते भूमीपूजन

“आम्ही कामगारांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरले. प्रकल्प सल्लागार कंत्राटदार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संपूर्ण टीमसाठी हे एक जिकिरीचे काम होते. मेट्रो-३ हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल”,असे मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) एस.के. गुप्ता यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com