अखेर ठाण्यातील 'सुपरमॅक्स' कंपनीला टाळे; ठेकेदारांची बिलेही थकली

close
closeTendernama

मुंबई (Mumbai) : कामगार आणि कंपनी प्रशासनातील संघर्षातून 'सुपरमॅक्स' ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या ठाण्यातील विद्युत मेटॅलिक्स कंपनीला येत्या 5 डिसेंबरपासून अधिकृतरित्या टाळेबंदी केली जाणार आहे. कंपनीचे संचालक केनी अब्राहम यांनी याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.

close
एसटीच्या डेपोंचा 'बीओटी'वर विकास; लवकरच जागतिक टेंडर निघणार

ठाण्यातील तीनहात नाका येथे विद्युत मेटालिक्स अर्थात सुपरमॅक्स या ब्लेड बनवणाऱ्या कंपनीत गेल्या काही दिवसांपासून कामगार आणि कंपनी प्रशासनात संघर्ष सुरु होता. कोरोना काळापासुन कंपनी तोट्यात चालत आहे. त्यानंतरही कंपनीचे आर्थिक गाडे रुळावर न आल्याने कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगारही मिळाला नाही. त्यातच कच्चा माल पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची बिलेही थकली होती. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनावरच परिणाम झाला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी कंपनीतील सर्व ऑपरेशन विभाग बंद झाले असून पुढील महिन्यात अधिकृत टाळेबंदी केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 1260 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

close
BMCची कोरोना काळातील टेंडर प्रक्रिया 'कॅग'च्या रडारवर

सुपरमॅक्स कंपनीचा हा वाद कामगार न्यायालयात पोहोचला आहे. कर्मचाऱ्यांनी उत्पादन प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर संपाचा अवलंब करु नये आणि त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कामाच्या वेळेत कामाचे ठिकाण सोडू नये, कर्मचाऱ्याने त्यांचे काम आणि शिस्तीच्या बाबतीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे, असे कंपनीच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com