'केडीएमसी'त 'रेरा' घोटाळ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा

Maharera
MahareraTendernama

मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवली शहरातील बनावट रेरा घोटाळ्याप्रकरणात आता बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Maharera
शिंदे-फडणवीसांमुळेच रखडली मोदींची बुलेट ट्रेन; 'गोदरेज'चा घणाघात

खोट्या सही शिक्क्याचा वापर करुन कंडोमपा महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून या खोट्या परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेने या प्रकरणात तक्रार दिल्यावर पोलिसांनी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. एसआयटीने खोटी कागदपत्रे तयार करून व्यवहार करणाऱ्या पाच जणांच्या आधीच मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हमकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन आणि कैलास गावडे यांचा समावेश आहे.

Maharera
कोयना सर्जवेल गळती दुरुस्तीचे टेंडर लवकरच; वीजनिर्मिती बंद ठेवणार

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेची बोगस बांधकाम परवानगीची कागदपत्रे तयार करून बांधकाम केल्याप्रकरणी एकूण ६७ प्रकरणांची नगररचना विभागाकडून पडताळणी केली असता, बांधकाम परवानगी दिलेली नसल्याने या बांधकामाच्या विकासकावर नगररचना विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत कायदेशीर कारवाई करून पूर्तता अहवाल त्वरित सादर करण्याबाबत प्रशासनाला यापूर्वी आदेश देण्यात आले आहेत. तथापि या प्रकरणी आजमितीस गुन्हे दाखल करणे व निष्कासनाची कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

Maharera
शिंदेजी, आणखी एक मेगा प्रोजेक्ट निसटला अन् महाराष्ट्र ४०० कोटीना..

या ६७ प्रकरणांमध्ये बोगस कागदपत्रे तयार करून बांधकाम केलेल्या आणि रहिवास मुक्त असलेल्या इमारतींवर निष्कासन कारवाई करण्यात यावी व सर्व प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. या निष्कासन कारवाई बाबत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा अथवा दिरंगाई केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com