अपयशी मोनोरेल मेट्रो आणि रेल्वेशी जोडणार; ६३ कोटींचे टेंडर

Monorail
MonorailTendernama

मुंबई (Mumbai) : आर्थिकदृष्ट्या अयशस्वी मोनोरेल (Monorail), मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. या कामासाठी सल्लागारासह बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे, सुमारे ६३ कोटी ६८ लाखाचे हे टेंडर आहे.

Monorail
ठाणे-नवी मुंबईला जोडणाऱ्या 'ऐरोली-काटईनाका'च्या खर्चात दुपटीने वाढ

देशातील पहिला आणि एकमेव असा चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएने मोनो मार्गिका मेट्रो आणि रेल्वेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलासह 'ट्रॅव्हलेटर' अर्थात सरकत्या मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने हे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Monorail
मुंबईत ५ वर्षात ३४० किमीवर मेट्रो धावेल; मुख्यमंत्र्यांची माहिती

पहिल्या टप्प्यात महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानकाशी मोनो जोडल्यानंतर पुढे चेंबूर, वडाळा आणि करी रोड रेल्वे स्थानकाशी मोनो स्थानके जोडली जाणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मोनो प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढून प्रकल्प आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याची आशा आहे. टेंडर अंतिम करून तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील एका वर्षात काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या कामासाठी ६३ कोटी ६८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. ३२५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभा करून त्यावर २६५ मीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा ट्रॅव्हलेटर बांधण्यात येणार आहे. आठ ट्रॅव्हलेटर बांधण्यात येणार असून तेथे चार उदवाहन असतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com