मुंबईतील गोखले पूल वाहतुकीस बंद; या सहा मार्गांद्वारे वाहतूक वळवली

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : अंधेरीतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत. पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याकाळात या परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी सहा मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai
एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेत स्पर्धा

उपनगरातील सर्वात रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक म्हणून अंधेरीतील गोखले पूल ओळखला जातो. हा अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडत असल्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मुंबई शहर आणि उपनगरातील ब्रीजचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सल्लागार नेमले होते. त्यामध्ये पश्चिम उपनगरातील गोखले ब्रीज हा अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने तातडीने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा असा सल्ला एससीजी कन्सलटन्सी सर्व्हीसेस लिमिटेडने सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अहवालात दिला होता. तसेच याठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी असेही त्या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले होते. ब्रीजच्या संपूर्ण भागात अनेक ठिकाणी गर्डरमध्ये स्टीलचा भाग गंजला असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक भागातील बेअरिंग खराब झालेल्या असून अनेक भागात स्लॅबचा भागही कोसळल्याचे अहवालात आहे. अनेक ठिकाणी स्टीलचा भागदेखील कॉंक्रिट पडून खुला झाल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने एससीजी कन्सलटन्टने तीनवेळा सर्वेक्षण केले. त्यामध्ये आढळलेल्या गंभीर बाबींमुळेच हा ब्रीज बंद करावा असा निष्कर्ष सल्लागाराकडून काढण्यात आला. या ब्रीजची गंभीर परिस्थिती पाहून याआधीच अवजड वाहनांसाठी २०२० पासूनच ब्रीज बंद करण्यात आला आहे. यामुळे पुनर्बांधणीसाठी हा पूल पुढील किमान दोन वर्षे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात या परिसरातील वाहतुकीसाठी पर्यायी सहा मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai
मुंबई : महत्त्वाच्या 'या' ब्रीजचे काम बीएमसी २ वर्षात करणार पूर्ण

'हे' पर्यायी सहा मार्ग असे आहेत.

- खार सबवे, खार
- मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ
- कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले
-अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई
- बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी
- मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com