कल्याण-डोंबिवलीत 'त्या' ४० बिल्डरांभोवती फास आवळला;बँक खाती गोठवली

Maharera
MahareraTendernama

मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवलीत (Kalyan-Dombivali) बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा परवानगी मिळवणाऱ्या सबंधित बिल्डरांभोवती एसआयटीने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाशी सबंधित 40 बिल्डरांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. खोट्या कागदपत्रे प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय आणि केडीएमसी आयुक्तांना एसआयटीने पत्र व्यवहार करुन सर्व प्रकारची पुढील प्रक्रिया थांबवण्याची सूचना केली आहे.

Maharera
मुंबईतील ४०० किमीच्या रस्त्याचे बजेट ७ हजार कोटींवर?

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आणि शिक्के वापरत अनेक बिल्डरांनी इमारतीच्या परवानग्या मिळविल्या होत्या. त्याच परवागीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेतले. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणात डोंबिवलीत एकूण 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. ईडीने देखील या प्रकरणाची माहिती संबंधित विभागांकडून मागितली आहे. आता या प्रकरणी एसआयटीने मोठे पाऊल उचलले आहे.

Maharera
मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे पाऊल पडते पुढे;'ओएसडी'चे यशस्वी लॉंचिंग

आतापर्यंत खोट्या कागदपत्रंचा वापर करणाऱ्या 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ज्या जमिनींचे व्यवहार झाले आहेत. त्या संदर्भात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या बिल्डरांनी ज्या ग्राहकांना घरे विकली आहेत. त्या नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. नियमित आणि अनियमित इमारतीसंदर्भात केडीएमसी आयुक्तांकडे माहिती मागितली आहे. सरकारी आरक्षित जागेवर काय परिस्थिती आहे. याचा आढावा देखील एसआयटीकडून घेतला जात आहे. 65 पैकी 7 बिल्डरांनी कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ बिल्डरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय 3 बिल्डरांना अटक पूर्व अंतरिम जामीन मंजूर करीत 3 आठवड्यांची मुदत दिली गेली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com