मुंबईत 'या' रेल्वे स्थानकावरून दुमजली उड्डाणपूल बांधणार

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : येत्या काही दिवसात ४.५ किमी लांबीच्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेत प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकावरून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून अशाप्रकारचा पहिलाच पूल बांधण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने हा पूल उभारला जाणार आहे.

Mumbai
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

सध्यस्थितीत मध्य रेल्वेने या पुलाच्या आराखड्याला मंजुरी दिली असून पश्चिम रेल्वेकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आले. एमआरआयडीसी आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तपणे ११ रस्ते, उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये रेल्वे हद्दीतील उड्डाणपूलही असून काही पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे.

Mumbai
मुंबई-गोवा मार्गावरील 'या' पट्ट्याचा तिढा मंत्र्यांनी सोडविला फक्त

याबरोबरच एमआरआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फतही ७ उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यात मुंबईतील शिवडी आणि प्रभादेवी-परळ रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूलाचाही समावेश आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी आणि मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकावरील समान असलेला उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल दुमजली असणार आहे अशी माहिती प्रकल्पातील उच्चपदस्थांकडून देण्यात आली. दरम्यान, या पुलाच्या रेखाचित्राला एमएमआरडीए तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेनेही मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या आराखड्याला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली असून पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com