'या' 2 नव्या पुलांसाठी मुंबई महापालिका खर्च करणार 57 कोटी

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : चेंबूर पूर्व मुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ जोड रस्ता खचत असल्याने येथील पूल धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी आरसीसीचे दोन नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सुमारे ५७ कोटी इतका खर्च करणार आहे.

BMC
शिंदे-फडणवीस सरकारचा पुन्हा यू-टर्न? 'हा' निर्णय फिरविण्याची...

मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम करून पुढील देखभालीकरिता पूर्व मुक्त मार्ग मुंबई महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या खात्यास २ मे २०१५ रोजी हस्तांतरित केलेला आहे. या ठिकाणी आणिक पांजरपोळ जोडरस्ता येथील माहुल खाडीवरील सध्यस्थितीतील दोन पूलांच्या दोन्हीबाजूकडील रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसतात व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणची जमीन कमकुवत असल्या कारणाने नवीन रस्ते बांधूनही या रस्त्याचा भाग खचत राहतो. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधणे गरजेचे आहे, असे पूल विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन नवीन पूल बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पावसाळा वगळून २४ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

BMC
टॅब खरेदीत 'महाज्योती'चे टेंडर फिक्सिंग? कोणी केला आरोप?

या दोन पुलांच्या बांधकामाला महापालिकेची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५७ कोटी ४१ लाख इतका खर्च करणार आहे. रस्त्याचे आराखडे, टेंडर व संररचना बनविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मे. टीपीएफ इंजिनीरिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका ८० लाख ५८ हजार खर्च करणार आहे. तसेच भुयारी मार्गाच्या लागत असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचा उतार विरुध्द्ध दिशेने असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे जलवाहिन्यांच्या पुनर्बांधणीचे काम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com