लवकरच मुंबईतील बीएमसीच्या मार्केटला मॉलचा लूक

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील महापालिकेची मार्केट आता नवीन डिझाईनमध्ये बांधण्यात येत असून मॉलच्या धर्तीवर मार्केटला लूक दिला जाणार आहे. नवीन डिझाईननुसार मार्केटमध्ये सरकते जिने, लिफ्ट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. फळे, भाजीपाला, किराणा दुकाने आदी विविध विभागांची दुकाने या मार्केटमध्ये स्वतंत्र मजल्यावर असणार आहेत. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध बाबींची खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे.

Mumbai
चांदणी चौकात पुढील 40 वर्षांचा विचार करून 'असा' बनविणार रस्ता

पहिल्या टप्प्यात जोगेश्वरी येथील नवलकर मार्केट व बोरिवली पश्चिमेकडील बोरिवली मार्केटचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची ९२ मार्केट असून १७ हजार १६४ गाळेधारक आहेत. महापालिकेच्या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. मॉलमध्ये किराणा दुकान, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, भाजी, मासांहार विक्रीची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने स्वतंत्र मजल्यावर असल्याचे पाहायला मिळतात. स्वतंत्र दुकाने असल्याने ग्राहकाला विविध वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता येईल. तसेच दुकानाबाहेरील परिसरात १० फूट मोकळी जागा ठेवण्यात येणार असून ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ नये, हा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी सांगितले.

Mumbai
नवी मुंबई मेट्रोकडून गुड न्यूज! बेलापूर ते तळोजा मार्गिकेचे...

पहिल्या टप्प्यात जोगेश्वरी येथील नवलकर मार्केट व बोरिवली पश्चिमेकडील बोरिवली मार्केटचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मार्केटचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख अधिकारी प्रकाश रसाळ यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com