'या' भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे झेडपीचे टेंडर

Thane Z P
Thane Z PTendernama

मुंबई (Mumbai) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेकडून या आजाराचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंडातून १० हजार लसी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Thane Z P
तगादा : महापालिका हद्दीतील खेड्यांचे झाले शहर; समस्यांचा मात्र कहर

जिल्ह्यात सध्या सुमारे एक लाख ७२ हजार गायी व म्हैसी आहेत. यामध्ये ८० हजार गाई; तर ९२ हजार म्हैशी यांचा समावेश आहे. या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी सरकारकडून १० हजार लशींचा साठा प्राप्त होणार आहे; पण जनावरांची संख्या आणि आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आता ठाणे जिल्हा परिषदेने जनावरांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी पावले उचलण्‍यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १० हजार लशी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Thane Z P
साहेब, तुम्हीच सांगा, समृद्धी महामार्गाचा अंडरपास ओलांडायचा कसा?

लम्पी स्कीन या आजाराबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये निरोगी जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० हजार लशींची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच याव्यतिरिक्त १० हजार लशी सरकारकडून प्राप्त होणार आहेत. अधिक मागणी केल्यास त्यादेखील पुरविण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे.
- डॉ. समीर तोडणकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. ठाणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com