मुंबईतील स्मशानभूमींसाठी बीएमसीचा मोठा निर्णय; तब्बल सव्वा 4 लाख..

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी दोन वर्षांसाठी ४९ स्मशानभूमींसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्याचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. ठेकेदारास (Contractor) ४ लाख ३१ हजार ५३२ क्विंटल जळाऊ लाकडाचा पुरवठा करायचा आहे.

BMC
साहेब, तुम्हीच सांगा, समृद्धी महामार्गाचा अंडरपास ओलांडायचा कसा?

शहर आणि उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या व खाजगी अशा एकूण ४९ हिंदू स्मशानभूमी असून, मुंबई महानगरपालिकेकडून या स्मशानभूमींना मोफत जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्यात येतो. महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनी यापुढे पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) दाहिनीमध्ये परार्वितत करण्यात येणार आहेत. तसेच सर्व स्मशानभूमीमध्ये पीएनजी दाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे पार्थिवाचे दहन विजेऐवजी गॅसवर आधारित दाहिनीत होणार आहे. यामुळे विजेची बचत होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हासही टाळणे शक्य होईल. मात्र अजही अंत्यसंस्कारांसाठी लाकडांची चिता रचण्याचा पारंपरिक पर्याय निवडण्याकडे नातेवाईकांचा कल आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने ४९ स्मशानभूमींना ४ लाख ३१ हजार ५३२ क्विंटल जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी टेंडर मागवले आहे.

BMC
पेमेंटसाठीच ‘एमकेसीएल’ची थांबली हकालपट्टी? मंत्र्याच्या आदेशाचेही

महापालिकेमार्फत हिंदू स्मशानभूमीमध्ये जळाऊ लाकडांचा मोफत पुरवठा केला जातो. सुमारे ८०० रुपये प्रति १०० किलो या दराने प्रति मृतदेह दहनासाठी २,३४९ रुपये किंमतीचे ३०० किलो लाकूड मोफत पुरवले जाते.
महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत पारंपरिक दहन स्मशानभूमी, विद्युत स्मशानभूमी आणि पीएनजीवर आधारित स्मशानभूमींचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चिता – स्थाने आहेत. तर ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून तिथे १८ शवदाहिनी आहेत. मुंबईत एकूण २३७ चिता-स्थाने आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com