'त्या' मेट्रोच्या मार्गातील मोठा अडथळा दूर; १०,९८६ कोटी खर्च

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : 'डी. एन. नगर - मंडाले - मानखुर्द मेट्रो २ ब' प्रकल्पाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) चिता कॅम्प येथील ४०० झोपड्या हटवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. या मार्गिकेसाठी १० हजार ९८६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Metro
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

डी. एन. नगर - मंडाले दरम्यान २३.६४३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम एमएमआरडीए करीत आहे. २० स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेसाठी १० हजार ९८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चिता कॅम्प परिसरातील ४०० झोपड्या या प्रकल्पात अडथला बनल्या असून हटविणे आवश्यक होते. अखेर एमएमआरडीएने या झोपड्या हटविल्या असून प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

Mumbai Metro
नाशिक-मुंबई प्रवासाला का लागताहेत 5 तास? NHAIकडून तारीख पे तारीख..

रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याच्या आधारे पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील झोपड्या पाडण्यात आल्या, असे एमएमआरडीएमधील उच्चपदस्थांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com