Mumbai
MumbaiTendernama

'त्या' ब्रिटिशकालीन पुलाचे काम नोव्हेंबरपासून सुरु; ४१ कोटी खर्च

Published on

मुंबई (Mumbai) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदरदरम्यान असणाऱ्या 154 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे बांधकाम येत्या नोव्हेंबरपासून सुरु केले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिका 41 कोटींचा खर्च करणार आहे. मे 2024 पर्यंत नवा पूल बांधून पूर्ण करण्यात येणार आहे.

Mumbai
ठाकरेंच्या निर्णयांना स्थगिती का दिली; न्यायालय म्हणाले शिंदेंना..

दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मोहमद अली रोड परिसरातील व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वपूर्ण आहे, मात्र या ऐतिहासिक पुलाची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे हा पूल नोव्हेंबर 2013 पासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 2018 मध्ये 'आयआयटी'ने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल आल्याने मुंबई महापालिकेने हा पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai
आतातरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ लेनचा करा ; अजित पवारांची मागणी

हा पूल वाहनांसाठी पूर्णपणे बंद झाल्यानंतर 50 टक्के वाहतूक मस्जिद बंदर येथील युसूफ मेहर अली रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे दाणाबंदरच्या दिशेने जाणाऱ्या पदपथावरील 27 झोपड्या पाडाव्या लागणार आहेत. पात्र झोपडपट्टीधारकांना चेंबूरमध्ये पर्यायी घरे देण्यात आली आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्या, दोन सार्वजनिक शौचालये, बेस्टचे वीज सबस्टेशन पाडण्यात येणार आहे.

Tendernama
www.tendernama.com