मुख्यमंत्र्यांचे ठाणे होणार चकाचक; रस्त्यांच्या सफाईसाठी एवढे कोटी

Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी ठाणे महापालिका ४० कोटी खर्च करणार आहे. महापालिका हद्दीतील २५० किमीच्या रस्त्यांची दिवसातून एकदा साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने गटनिहाय २२ टेंडर प्रसिद्ध केली आहेत.

Thane Municipal Corporation
मुंबई : रस्त्यांच्या ५८०० कोटींच्या टेंडरसाठी २५ कंपन्यांत स्पर्धा

ठाणे शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी महापालिकेचे सफाई कामगार कमी पडत असल्याने महापालिकेने खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील २२ गटातील रस्त्यांची साफसफाई सुरु केली आहे. त्यानुसार या कामासाठी एक हजार ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून केली जाणार आहे. महापालिकेने यासाठी २२ टेंडर काढले असून, यामध्ये केवळ शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात रस्ते सफाईची मुदत संपल्याने हे टेंडर काढण्यात आले असून, यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

Thane Municipal Corporation
साडेतीन किमीच्या भूमिगत मार्गासाठी नेमणार सल्लागार; MMRDAचे टेंडर

महापालिका हद्दीतील २५० किमीच्या रस्त्यांची यामध्ये सफाई होणार असून सकाळी सात ते तीन या सत्रात एकच वेळ ही सफाई केली जाणार आहे. २२ स्वतंत्र टेंडर काढण्यात आले असल्याने प्रत्येकाला प्रभागानुसार सफाईची कामे दिली जाणार आहेत. ४० ते ४५ कर्मचाऱ्यांचा एक एक गट करून कामांची विभागणी केली जाणार असून प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतिदिन किमान वेतनाप्रमाणे १०५० रुपये अदा केले जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ठेकेदारांनी जास्त दराने टेंडर भरले आहेत, त्यांनाच या कामांसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. केंद्र सरकारच्या एका अधिसूचनेचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com