मुंबईत ३० ठिकाणी उभारणार फाईव्ह ते सेव्हन स्टार स्वच्छतागृहे

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई शहर व उपनगरात ३० ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. फाईव्ह स्टार ते सेव्हन स्टार अशा अद्ययावत स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी कॅफेसारखे मॉडेलही विकसित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

Mumbai
शिंदे-फडणवीस जोडी येऊनही 'समृद्धी'चे लोकार्पण लांबणीवर?

वाढत्या लोकसंख्येनुसार आता स्वच्छतागृहांच्या संख्यावाढीवर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने भर दिला आहे. विशेष म्हणजे, शौचालयांच्या संख्येत वाढ करण्याबरोबर शौचालयात आंघोळ, कपडे धुण्यासाठी जागा, उपकरणे चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरात ३० ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांची कमतरता भासू नये, यासाठी अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले.

Mumbai
मुंबई मेट्रो-3 च्या वाढीव १०,२६९ कोटींच्या खर्चाला मान्यता

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत तीन हजारांच्या घरात स्वच्छतागृहे आहेत. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात पोहोचली असून, मुंबई दर्शनासाठी रोज हजारो पर्यटक मुंबईत येत असतात. मुंबईत खास करून महिलांची अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे गैरसोय होते. त्यामुळे नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकूण ३० ठिकाणी फाईव्ह स्टार ते सेव्हन स्टार अशा अद्ययावत स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांत आंघोळीच्या सुविधेसोबतच कपडे धुण्यासाठीची, तसेच उपकरणे चार्जिंगची सुविधा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी कॅफेसारखे मॉडेलही विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन असून, यामुळे मुंबई महापालिकेला महसूल प्राप्त होईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com