मुंबईत एसी ई-डबल डेकर बसचा मुहूर्त ठरला; 900 बसेसचा समावेश

BEST
BESTTendernama

मुंबई (Mumbai) : बेस्ट उपक्रमांतर्गत मुंबईकरांच्या सेवेत एसी बसनंतर येत्या १८ ऑगस्टपासून एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बेस्टने आपल्या ताफ्यात 900 डबल डेकर बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ही बस अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अशी असणार आहे. यामध्ये नव्या बसला दोन जिने, डिजिटल टिकटिंगची सोय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

BEST
शिंदे सरकार 'या' योजनेतील रस्त्यांची चौकशी करणार का?

बेस्टने आपल्या ताफ्यात तब्बल 900 डबल डेकर बसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस 18 ऑगस्टला बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या डबल डेकर बस या डिझेलवर धावत आहेत. मात्र ही बस इलेक्ट्रिक असणार आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवास आरामदायी व्हावा यासाठी या बसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये या बसला दोन जिने असणार आहेत. तसेच डिजिटल टिकटिंगची सोय आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये या बसबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून येते.

BEST
नवी मुंबई एयरपोर्ट परिसरात बांधकाम उंचीची मर्यादा तिप्पट; आता...

या बस सुरुवातीला तीन मार्गावरून धावणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. किमान अंतरासाठी म्हणजेच पाच किलोमीटरसाठी प्रवाशांकडून सहा रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com