खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीचे टेस्टिंग; 'या' तंत्रज्ञानाचा वापर

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल याची चाचपणी सध्या मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून सुरु आहे. त्यामध्ये चार पद्धतीच्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यात येत आहेत. सिमेंट कॉंक्रिट रोड आणि डांबरी (अस्फाल्ट) रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापराचे प्रात्यक्षिक करण्यात येते. जिओ पॉलिमर, पेव्हर ब्लॉक, एम ६०० आणि रॅपिड हार्डनिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला जात आहे. येत्या काळात यापैकी यशस्वी तंत्रज्ञान मुंबईतील रस्त्यांवर वापरण्यात येणार आहे.

Mumbai
सत्ताबदल होताच बुलेट ट्रेनचे टेंडर सुसाट; साडेचार वर्षांतच...

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉंक्रिट रोडचे काम हाती घेण्यात येत आहे. अनेकदा सिमेंटचा संपूर्ण ब्लॉक दुरुस्त करणे खर्चाचे तसेच वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामध्ये वाहतूकही मोठ्या प्रमाणात थांबवावी लागते. म्हणूनच जिओ पॉलिमरचा वापर करून २ ते ४ इंचापर्यंतचे खड्डे बुजवण्यासाठी हे मटेरिअल उपयुक्त आहे. त्यामध्ये सीसी रोडला पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करणे शक्य आहे. ५ हजार रूपये प्रति चौरस मीटर इतका तंत्रज्ञानाचा खर्च आहे. महत्वाचे म्हणजे अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या आणिक वडाळा मार्गावर या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. जिओ पॉलिमर हे पेटंट असणारे मटेरिअल असून त्यामध्ये एडेसिव्हचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या २ तासांमध्ये त्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु करणे शक्य होते.

Mumbai
मविआला 'बिगशॉक'; सव्वा वर्षातील टेंडर न काढलेल्या कामांना स्थगिती

डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सर्वात स्वस्त अशा पेव्हर ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अवघ्या ५०० रूपये चौरस मीटर इतके स्वस्त हे तंत्रज्ञान आहे. महत्त्वाचे म्हणजे चांगल्या दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरून दीर्घकाळ वापरात येणारे हे तंत्रज्ञान आहे. पेव्हर ब्लॉकला आयुष्यमान अधिक आहे. तसेच अवजड वाहनांच्या रस्त्यावरही हे उपयुक्त ठरणारे असे तंत्रज्ञान आहे. या प्रकारात एम ६०० हे सिमेंट खड्डे बुझवण्यासाठी वापरण्यात आले. हे सिमेंट वापरून खड्डे बुजवण्यासाठी सात दिवस इतका कालावधी लागतो.

Mumbai
मोठी बातमी : मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदेंनी बंदी उठवली

रॅपिड हार्डनिंग पॉलिमर कॉंक्रिटचा वापर करून खड्डे बुजवण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानात खड्डा बुजवण्यासाठी सात ते आठ तासांचा वेळ लागतो. कोल्डमिक्सच्या तुलनेत रॅपिड हार्डनिंगमुळे मटेरिअल घट्ट पकड घेते. परंतू तुलनेत हा पर्याय खर्चिक आहे. या तंत्रज्ञानात प्रति चौरस मीटरसाठी २३ हजार रूपये इतका खर्च येतो. इतर तीन तंत्रज्ञानाच्या तुलनेत हा महागडा पर्याय आहे.

मुंबईतील आणिक वडाळा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळेच या रस्त्यावर वाहन चालकांना दिलासा देण्यासाठीच आम्ही चार वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. येत्या काळात यापैकी यशस्वी तंत्रज्ञान मुंबईतील रस्त्यांवर वापरात येईल.
- उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सुविधा), मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com