इम्पॅक्ट : औरंगाबाद-जळगाव महामार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट आणि संथगतीने होत असलेल्या बांधकामावर टेंडरनामाने प्रहार करताच जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तूनिष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पाठोपाठ कार्यकारी अभियंत्यांनी तडकाफडकी बैठक घेत दर्जेदार रस्ता तयार करा, कामाची गती वाढवा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. एवढेच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी करत अहवाल तयार करायचे काम देखील सुरू केले आहे.

Aurangabad
जी-20च्या शिखर परिषदेसाठी औरंगाबाद सज्ज; ...अशी आहे तयारी?

टेंडरनामाने वृत्त प्रकाशित करताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या योजनेंतर्गत राज्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या देखरेखीत सुरू असलेल्या औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गातील निकृष्ट आणि कासवगतीने सुरू असलेल्या कामाची राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवने यांनी गुरूवारी (ता. २४) रोजी प्रत्यक्षात रस्त्यावर जाऊन अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तसेच ठेकेदारांसह प्रकल्प सल्लागार समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अपूर्ण व निकृष्ट काम ठेकेदारामार्फत सुस्थितीत करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यापासूनच असंख्य ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यापूर्वी खा. राजकुमार धुत, रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी ठेकेदाराला सूचना केल्या होत्या. विशेष म्हणजे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हान यांनी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यामार्फत ठेकेदाराला आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून काळ्या यादीत समावेश करू अशा आशयाच्या नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या. अनेक वेळा लेखी व तोंडी सांगुनही अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामाकडे दुर्लक्ष केले. 

Aurangabad
Good News! जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी 74 कोटींचे टेंडर

३ सब ठेकेदारांची निवड

यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून गडकरी यांच्या आदेशाने लॅन्को ऋत्विक एजन्सीकडेच कामाचा मुळ ठेका ठेऊन औरंगाबाद ते सिल्लोड आर. के. चव्हाण कंन्ट्रक्शन कंपनी, सिल्लोड ते फर्दापूर आर. एस. कामटे आणि फर्दापूर ते जळगाव स्पायरा इन्फ्रा या तीन ठेकेदारांना सब ठेकेदार म्हणून नियुक्ती केली. 

तीन टप्प्यात ३ सल्लागार; तरिही..

चौपदरीकरणाचे मॉनिटरिंग आणि रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसह रखडलेले चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने महामार्ग विभागाने औरंगाबाद-सिल्लोड या पहिल्या टप्प्यासाठी मुंबईच्या स्टप कंन्सलटंट, सिल्लोड - फर्दापूर या दुसर्या व फर्दापूर-जळगाव या तिसऱ्या  टप्प्यासाठी बिहारच्या पीआयडीसी कन्स्लटंट यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली. मात्र बांधकामासाठी तब्बल तीन ठेकेदारांची नियुक्ती केली. सल्लागार नेमले तरीही संथगती आणि कामात निकृष्ट दर्जा कायम राहीला.

असा झाला परिणाम

गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या या कामामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली. शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. गावकरी, मातब्बर लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर देखील कामात जैसे थे परिस्थिती होती.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

नेमके टेंडरनामाने प्रकाशित केलेले वृत्त आणि जी-२० परिषदेनिमित्त होत असलेली जिल्हा प्रशासनाची तयारी या गरबडीत असलेले जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांनी वृत्त पाहताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवने यांना सदर रस्त्याचा वस्तुनिष्ठ पाहणी अहवाल सादर करायचे आदेश दिले. 

अखेर कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी 

अखेर औरंगाबाद-अजिंठा या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे दशावतार पाहताच जिल्हाधिकारी आस्तीकुमार पाण्डेय याच्या आदेशानंतर कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवने यांनी उपअभियंता अभिजित घोडेकर, कनिष्ठ अभियंता सागर कळंब, गजानन कामेकर तसेच ठेकेदार व प्रकल्प सल्लागार समितीच्या प्रतिनिधींसह रस्त्याची पाहणी केली. निकृष्ट काम सुधारून देण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. तसेच आयआरसीच्या नियमानुसार रस्त्यावर थर्मापेस्टचे पांढरे पट्टे, कॅटऑइज, दिशादर्शक फलक, दुभाजकाची रंगरंगोटी व आवश्यक तिथे झेब्राक्राॅसिंग करायच्या सूचना दिल्या. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com