6 कोटींच्या रस्त्यातील दुभाजकाच्या सुशोभीकरणाचा निधी कोणी लाटला?

6 कोटींच्या रस्त्यातील दुभाजकाच्या सुशोभीकरणाचा निधी कोणी लाटला?
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील मोंढानाका ते जाफरगेट - आठवडी बाजार रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून एमएसआरडीसीने दुभाजकाचे बांधकाम देखील केले. हे काम करताना रस्ता दुभाजकात तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मात्र अद्याप काळी माती टाकून सुशोभीकरण करण्यात आले नाही. यासंदर्भात ठेकेदाराकडे विचारणा केली असता टेंडरमधील अटी शर्तीनुसार दुभाजकात माती टाकण्याचा मुद्दा नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारले असता ती जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता बी. डी. सालुखे यांनी मात्र याबाबत मौन पाळले. त्यामुळे दुभाजकातील माती आणि सुशोभीकरणाचा निधी कोणी खाल्ला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

6 कोटींच्या रस्त्यातील दुभाजकाच्या सुशोभीकरणाचा निधी कोणी लाटला?
100 वर्षे जुन्या 'या' पुलाचा लवकरच मेकओव्हर; तब्बल 374 कोटी खर्चून

दुभाजकातील खड्ड्यात आसपासचे नागरीक, तसेच मांस विक्रेते कचरा आणि टाकाऊ बांधकाम साहित्य टाकत असल्यामुळे वाहनधारकांना दुर्गंधीची समस्या निर्माण निर्माण झाली आहे. तसेच जुनाट डेब्रिजची भरती केल्यामुळे त्यावर कुत्र्यांनी बस्तान केल्याने कुत्र्यांमुळे सातत्याने येथे किरकोळ अपघात झाले आहेत. शिवाय धुळीमुळे देखील वाहनधारक त्रस्त आहेत. यामुळे दुभाजकात काळी माती टाकून दुभाजकाचे त्वरीत सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

6 कोटींच्या रस्त्यातील दुभाजकाच्या सुशोभीकरणाचा निधी कोणी लाटला?
बकोरियांसारखा विद्यमान प्रशासक रुंदीकरण मोहीमेचा धडाका दाखवणार का?

राज्य शासनाने औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातून २० रस्त्यांची कामे केली गेली. यापैकी रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सात रस्त्यांची कामे दिली होती. टेंडर प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर त्यापैकी २७ ऑक्टोबर २०२० रोजी मोंढानाका ते जाफरगेट ते आठवडी बाजार या एका रस्ता बांधकामाची जबाबदारी औरंगाबादेतीलच रमजान चारनीया यांच्या चारनीया कंन्सट्रक्शन कंपनीला काम देण्यात आली होती. 

सहा कोटीचा रस्ता सुशोभीकरणाविना विद्रूप

या कामासाठी तब्बल सहा कोटी ११ लाख ३१ हजार ७१२ रुपये खर्च करण्यात आले. २६ एप्रिल २०२१ रोजी ठेकेदाराने रस्त्यासह दुभाजकाचे काम पूर्ण केले. या रस्त्याचा दोष निवारण कालावधी पाच वर्षांचा आहे. मात्र दुभाजकाचे बांधकाम केल्यानंतर खड्ड्यात काळी माती टाकून सुशोभीकरणाचा विसर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला पडला. त्यामुळे दुभाजकातील बकालीने सहा कोटींचा हा नवाकोरा रस्ता विद्रूप दिसत आहे.

6 कोटींच्या रस्त्यातील दुभाजकाच्या सुशोभीकरणाचा निधी कोणी लाटला?
BMCचे आता 'मिशन गोखले पूल'; 84 कोटींचे टेंडर

अशी आहे आकडेवारी

● जाफरगेट ते मोंढा नाका आणि जाफर गेट ते आठवडी बाजार रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे 

● लांबी ९५० मीटर 

● अंदाजपत्रकीय रक्कम ९ कोटी ४३ लाख रुपये

● टेडर अंतिम करताना प्रत्यक्षात झालेला खर्च ६ कोटी ११ लाख ३१ हजार ७१२ रुपये

● ठेकेदाराचे नाव : चारनीया कंन्सट्रक्शन कंपनी, औरंगाबाद

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com