रेड्डी कंपनीला एक लाखांचा दंड; बजावली कारणे दाखवा नोटीस, कारण...

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कामात गत चार वर्षांपासून सुधारणा नाही. यापूर्वी कंपनीकडून शंभरवेळा कारणे दाखवा नोटीस बजावत १२ लाखाचा दंड वसुल केला आहे. दरम्यान, बुधवारी देखील कंपनीच्या  चांगल्याच मुसक्या आवळल्या. कंपनीवर नेहमीप्रमाणे  नियोजनशून्य कारभाराचा ठपका ठेवत महापालिका उपायुक्त तथा घनकचरा प्रमुखांनी थेट एक लाखाचा दंड लावला. याचबरोबर कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.

Aurangabad
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर घडणार इतिहास; देशातील सर्वांत उंच...

कचराकोंडीत अडकलेल्या महापालिकेने शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे चार वर्षापूर्वी खासगीकरण केले आहे. बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामाबद्दल व्यावसायिक, नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होतात. कंपनीला कचऱ्याच्या वजनावर महापालिका पेमेंट करते. प्रतिटन प्रतिदिवस २१५०  रुपये कंपनीला दिले जातात. दरमहा ३ कोटी रूपये कचरा संकलन व वाहतूकीपोटी कंपनीला दिले जातात. मात्र कचऱ्याचे वजन वाढावे व जास्तीचे पेमेंट मिळावे यासाठी कंपनीचे कर्मचारी हातचलाखी करत असल्याची प्रकरणे स्वतः तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी यापूर्वी उघड केले होते. कचऱ्याच्या गाडीत दगड, माती, विटा आढळून आल्याने कंपनीवर यासंदर्भात क्रांतीचौक आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात पाण्डेय यांच्या आदेशावरून तत्कालीन घनकचरा प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी गुन्हे देखील दाखल केले होते. 

Aurangabad
मंत्रालयात मोठा खांदेपालट; वल्सा नायर सिंह यांच्याकडे हौसिंग, तर..

१२ लाखाची दंड वसुली

आत्तापर्यंत कंपनीकडून मागील तीन वर्षात  कामात हलगर्जीपणा, वेळेत कचरा न उचलणे, घंटागाडींची अपुरी संख्या त्याशिवाय दुपारनंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा न उचलणे, झोनमध्ये अवेळी घंटागाडी पाठवणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने आणि वेतन वेळेवर न देणे आदी तक्रारींची दखल घेत तत्कालीन घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकुमार भोंबे, सौरभ जोशी यांनी १२ लाखाचा दंड वसुल केला आहे. यानंतर नवनियुक्त उपायुक्त तथा घनकचरा प्रमुख सोमनाथ जाधव यांनी कंपनीवर दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. 

आता एक लाखाचा दंड 

बुधवारी जाधव शहरातील कचरा संकलनाची पाहणी करताना करारानुसार कंपनी काम करत नसल्याचे स्पष्ट झाले. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना लाऊड स्पीकर नव्हते. परिणामी संबंधित वसाहतीत घंटागाडी कधी येऊन गेली कधी गेली हे कळत नाही. कचरा संकलन केल्यानंतर कचरा प्रक्रिया केंद्राकडे वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ताडपत्रीने त्या झाकल्या नसतात. परिणामी कचरा हवेने रस्त्यावर उडतो व नागरिकांना देखील दुर्गंधीचा त्रास होतो. याशिवाय व्यावसायिकांकडील कचरा दररोज सायंकाळी जमा, असा टेंडरमधील अटी-शर्तीनुसार करार झालेला असताना कंपनीकडून आठवड्यातून एक वा दोन दिवस घंटागाडी पाठवली जाते. परिणामी व्यावसायिकांची गैरसोय होत असल्याने ते रस्ता दुभाजक अथवा उघड्यावर कचरा टाकतात. याची गंभीर दखल घेत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी एक लाखाची दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. शिवाय कंपनीला कारणे दाखवा नोटीस देखील बजावत निर्णय घेतला आहे.

Aurangabad
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

काय आहे करारात 

महापालिकेने २०१८ मध्ये शहरातील कचरा संकलन व चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी व हर्सुल या चार कचरा प्रक्रिया केंद्रात वाहतूक करण्यासंदर्भात टेंडर काढले होते. कंपनीसोबत करार करताना कचरा संकलन पॉइंटवर तसेच वॉर्डांमधील अंतर्गत रस्त्यांवर पडलेला कचरा सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलावा. वॉर्डांमध्ये दारोदार दररोज कचरा संकलन करावे. कचरा वेचणाऱ्या व घंटागाडीवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज व अन्य सुरक्षा साहित्याचा पुरवठा करावा. उघड्यावर जिथे कचरा टाकत असतील त्या पाॅईंटवर सुचना फलक लावने. मात्र या सर्व अटी व शर्ती कंपनीकडून वारंवार धाब्यावर बसवल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com