व्यापाऱ्यांनी केले रस्त्याचे काम बंद, प्रवाशांचे हाल; खोदकामामुळे

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : जवाहर काॅलनी परिसरातील त्रिमुर्ती चौक ते आकाशवाणी मार्गाचे काम सोमवारी दुपारी चारच्या सुमारास सुरू करण्यात आले. मात्र येथील दोन कापड व्यापाऱ्यांनी ते बंद पाडल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, बहुतांश भागात रस्ता खोदून ठेवल्याने आता प्रवाशांचे हाल सुरू झाले. दिवाळीला दोन महिने अवधी असल्याने, हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जवाहर काॅलनीतील रहिवाशी व प्रवाशांमधून होत आहे.

Aurangabad
शिंदे सरकारची नुसतीच घोषणा; जुन्या जलवाहिनीसाठी मंजुरीची...

गारखेडा भागातील जवाहर काॅलनी परिसरातील गजानन महाराज मंदिर चौक ते त्रिमुर्ती चौक -  आकाशवाणी  दरम्यानच्या रस्त्याच्या  कामाचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला आहे. ए.जी. कन्स्ट्रक्शन ही कंपनी करत आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यातील गजानन मंदिर चौकापासून रस्त्याच्या कामाची सुरूवात न करता थेट त्रिमुर्ती चौक ते आकाशवाणी या दुसर्या टप्प्याच्या कामाला सुरूवात केली. त्रिमुर्ती चौकातील डाव्या बाजूने जेसीबीने अर्धा फुट रस्ता खोदून त्या जागेवर खड्डे करण्यात आले.  या कामाबाबत मार्गावरील दोन कापड व्यावसायिकांनी आधीच कोरोना काळात व्यवसाय ठप्प होते, गेल्यावेळी दिवाळीत दमडी देखील कमवली नाही, या दिवाळीत तरी काही धंदे होऊ द्या म्हणत  या रस्त्याचे काम दिवाळीनंतर करा असे कंपनीच्या अभियंत्यांवर राजकीय दबाब आणत काम  बंद केले. डाव्या बाजूने रस्त्याच्या तोंड्यालाच उकरलेल्या  मातीचा ढिगाऱ्याचा डोंगर आडवा करून कंपनी अधिकाऱ्यांनी तेथून यंत्रणा पसार केली. मातीच्या ढिगार्याचा अडसर आणि अर्धवट खोदकामामुळे अडथळा निर्माण होत आहे. मोठी वाहतूक असलेल्या या मार्गावर सोमवारपासून उजव्या बाजुने एकेरी वाहतूक  सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

Aurangabad
शिंदे-फडणवीस सरकारचा पुन्हा यू-टर्न? 'हा' निर्णय फिरविण्याची...

गारखेड्यातील दक्षिण  भागातील नागरिकांचा जालना रस्त्याशी  नित्य संपर्क असतो. रस्त्याच्या तोंडालाच मातीचा ढिगारा लावून रस्ता बंद केला. पुढे अर्धवट  रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्यावरून होणारा  प्रवास बंद करत आता एकेरी वाहतूक करताना प्रवाशांना  कसरत करावी लागत आहे. त्यात काम बंद ठेवल्याने रस्त्यालगत इतर दुकानदारांच्या अडचणीत भर पडली आहे. दिवाळीला दोन महिन्याचा कालावधी बाकी असताना स्मार्ट सिटी कंपनीने  कुठल्या कारणातून काम बंद ठेवले, याची खातरजमा करून हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

‘काम तातडीने सुरू करावे’

माजी महापौर त्र्यंबक तुपे  म्हणाले, रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात काम बंद ठेवले गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी मी दहा वर्षापासून पाठपूरावा करत आहे. कुणाच्याही फायद्यासाठी  हे काम बंद करता येणार नाही. तेथील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन गैरसमज दूर करतो आणि  तातडीने काम सुरू करण्यात यावे याबाबत कंपनीला देखील सांगतो.

Aurangabad
'लम्पी'साठी सरकार सरसावले; 873 पशुधन पर्यवेक्षक भरतीसाठी टेंडर

दुसऱ्या बाजूने चालू केले..

माजी नगरसेविका अंकिता विधाते यांना विचारले असता त्या म्हणाल्या, रस्त्याचे काम आकाशवानीकडून नवा मराठा हाॅटेल पर्यंत सुरू करायला सांगितले. काम  बंद ठेवण्यात आले नाही. नवरात्रोत्सव जवळ आल्याने तसा निर्णय घेतला. उत्तरेकडून काम सुरू केले आहे. दिवाळीआधी संपुर्ण रस्ता होईल.

'गुलमंडी रस्त्यासारखी अवस्था नको' 

त्रिमुर्ती चौकातून सुरू केलेले काम अचानकपणे बंद ठेवण्यात आल्याने उत्तमनगरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, मध्येच काम बंद पाडल्याने त्या परिसरातील नागरिकांना जीवावर उदार होऊन खड्ड्यातून  प्रवास करावा लागत आहे. गतवर्षी ऐन दिवाळीत  गुलमंडी भागातील नागरिकांची जशी फसगत केली तशी परिस्थिती इकडे होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com