औरंगाबादेत दुभाजकात मातीऐवजी...; कंत्राटदार-अधिकाऱ्यांची मिलिभगत

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : महापालिकेकडून शहरातील २५ प्रमुख रस्त्यांवर दुभाजकाची कामे सुरू आहेत. यात सेव्हनहील ते गजानन मंदिररोडवरील दुभाजकांमध्ये मातीऐवजी जुन्या दुभाजकातील फोडलेले काँक्रिट टाकण्यात येत आहे. याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची मागणी सातारा-देवळाई डोंगर गृपचे विजय चिंतामणी या पर्यावरणप्रेमीकडून केली जात आहे. यासंदर्भात गृपच्या वतीने महापालिका प्रशासक डाॅ.अभिजित चौधरी यांची देखील भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे चिंतामणी यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

Aurangabad
मुंबई पालिकेभोवती चौकशीचा फास, कॅगकडून विशेष ऑडिट होणार; शिवसेना..

शहरातील रस्तांची कामे सरकारी योजनेतून झाली. मात्र निधी अभावी दुभाजक बांधकामात अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. टेंडरनामाने कधी संपणार दुभाजकातील दशावतार या मधळ्याखाली सातत्याने आवाज उठवला. शहरातील दुभाजकांच्या बाबत औरंगाबाद खंडपीठात देखील एकाने याचिका दाखल केली. खंडपीठासह सुप्रीम कोर्टाने महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांना जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार दुभाजक बांधकामाच्या सुचना केल्या. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या ६५ कोटी रूपयातून २० कोटीचे दुभाजक बांधकामाचे अंदाजपत्रक केले.

Aurangabad
ठाण्यातील टेंडरवरून मंत्री चव्हाणांनी प्रशासनाला दिली डेडलाईन, का?

यानंतर २० कोटीचे टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या लातुरच्या के. एच. कन्सट्रक्शन कंपनीचे खंडूजी पाटील या एकाच कंत्राटदाराला दुभाजक बांधकामाचे टेंडर देण्यात आले. परंतु, महापालिकेतील कार्यकारी अभियंता भागवत फड, राजीव संधा, प्रभाग अभियंता राजेश वाघमारे यांचे सुरू असलेल्या दुभाजक बांथकामांकडे लक्ष नसल्याने ठेकेदार मनमर्जीपणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. यात सेव्हनहिल ते सुतगिरणी रोडवरील दुभाजकाचे टाकण्याचे काम जोमाने सुरू आहे. परंतु, दुभाजकामध्ये माती टाकण्याऐवजी ठेकदाराकडून फोडलेल्या जुन्याच दुभाजकातील काढलेल्या काँक्रिट गट्टूचा भरतीसाठी वापर केला जात आहे. विशेष म्हणजे दुभाजकात महापालिकेकडून येत्या काही दिवसात झाडे लावली जाणार आहेत. दुभाजकात टाकलेल्या जुन्या काँक्रिट गट्टू टाकल्यावर महापालिका लावणार असलेली झाडे जगतील काय? असा सवाल विजय चिंतामणी यांनी उपस्थित केला आहे. त्यात दुभाजक कामात क्युरिंग देखील प्राॅपर केली जात नाही. एका बाजुने चढ दुसऱ्या बाजूने उतार तसेच काही ठिकाणी दुभाजक क्रॅक गेल्याची तक्रार अनिल सुर्यवंशी यांनी केली आहे. सुरू असलेल्या दुभाजक कामात निकृष्टपणा दिसत असताना महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी करतात, काय असा देखील सवाल यानिमित्ताने सर्वसामान्यांना पडत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com