50 लाखांच्या बियांची उधळण तरीही कास पठारावरील टेकड्या भकास का?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : जिल्ह्य़ाला ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कास पठारावरील आठ टेकड्यांवर विविध प्रजातींची फुलांची लागवड करण्यात आली. यासाठी अर्धाकोटीच्या बियांची उधळण करण्यात आली. मागील दीड वर्षापूर्वी एका तत्कालीन सीईओच्या पुढाकाराने अर्धा कोटी रूपये खर्च करण्यात आला. मात्र, अद्याप एकाही कास पठारावरील टेकड्यांना फुलांनी बहार आला नसल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे.

Aurangabad
कंत्राटदारावर का भडकले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर; थेट कानशिलात

असा आहे अधिकाऱ्यांचा दावा...

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल भोकरे यांच्याकडे विचारणा केली असता हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला आहे. कामात कुठेही गडबड घोटाळा नसल्याचे म्हणत त्यांनी गत अतिवृष्टीत नुकसान झाले असावे, फुलांचा काळ हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतो निश्चित टेकट्या बहरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र फुलांची झाडंच टेकड्यावर नसल्याने बियांना बहार येणार कसा, असा प्रश्न उपस्थित केल्यावर टेकड्यातील एकर-अर्धा एकर परिसरातील रोपे आपणास दिसली नसावी. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रसिद्ध अशा कास पठाराच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्य़ामधील टेकडय़ांवर स्थानिकसह पश्चिम घाट-उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील पुष्पबीजांचे रोपण करून झकास पठार तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांनी ३ मार्च २०२१ घेतला होता. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह औरंगाबाद जिल्ह्यातील कास पठारावरील टेकड्यांची स्वतः पाहणी केली होती. एवढेच नव्हे, तर तज्ज्ञांमार्फत पाणी हवा आणि तापमानासह माती तपासणी देखील केली होती.

Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यातील पुरवठादार गुजराती व्यापाऱ्यांवर का संतापले?

या ठिकाणी बिजारोपण केल्याचा दावा

सर्वेक्षण अहवालाअंती डाॅ. गोंदावले यांनी जिल्ह्य़ातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी या आठ टेकडय़ांच्या परिसरात कास पठाराच्या धर्तीवर पुष्पांचे बीजारोपण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बीजारोपण केल्याचा दावा उपमुख्याधिकारी सुनिल भोकरे करत आहेत. मात्र प्रतिनिधीने सलग आठ दिवसात भीज पावसात या टेकड्यांची पाहणी केली असता कुठेही बीजारोपण झालेले आढळुन आले नाही. आता मात्र प्रशासन पुढील सप्टेंबर ऑक्टोबरचा कालावधी देत आहेत. राज्यातील पश्चिम घाट परिसर असलेल्या सातारा जिल्ह्य़ातील तापमान, भौगोलिक हवामान व त्याच अंगाने औरंगाबाद जिल्ह्य़ाचाही विचार करून गोंदावले यांच्या आदेशाने स्थानिक पातळीवरील, सांगली, सातारा, बुलडाणा, नाशिक आदी परिसरात उगवणाऱ्या ७० प्रकारचे पुष्पबीज संकलित केल्याचे कागदपत्रात दिसून येत असले तरी हा या नावीन्यपूर्ण प्रयोग नेहमीप्रमाणे कागदावरच रंगवल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कास पठारावरील टेकड्या झकास नव्हेतर भकास दिसत असल्याचे चित्र आहे.

Aurangabad
बीएमसीचे 'ते' 25 कोटींचे टेंडर फ्रेम? काय आहे भाजपची मागणी?

प्रकल्प समन्वयकाची निवड

या प्रयोगासाठी औरंगाबादेतील स्वप्नील सरदार यांची प्रकल्प समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. त्यात सरदार यांनी विशेष तज्ज्ञांमार्फत सातारा आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्य़ांचे हवामान, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन व प्रत्येक जिल्ह्य़ात असणारे विशिष्ट प्राणी, वनस्पती आदींचा अभ्यास करून त्यानुसार झकास पठार आकारास आणण्यासाठी दिड वर्षापूर्वीच काम सुरू केले होते.

सीईओंच्या स्तुत्य प्रकल्पातील बिया कुणी गिळल्या ?

एकीकडे तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय यांचे खामनदी स्वच्छता अभियान पाहुन भारावलेल्या जिल्हा परिषद सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांना ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्य़ाची ओळख जागतिक पर्यटननगरी म्हणून आहे. देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ पाहून त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पातळीवरील स्थळे पाहण्यासाठी अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या. येथील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांनी सातारा जिल्ह्य़ातील कास पठाराच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकल्पाची जबाबदारी स्विकारणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांनी बिजारोपणाच्या नावाखाली बिया गिळल्या याचा शोध विद्यमान जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. निलेश गटाणे घेतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Aurangabad
पोषण आहाराचा दर्जा सुधारला नाही तर टेंडर रद्द; ठेकेदाराला इशारा

बीजबँक गेली कुणीकडे

विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदानी, गुलाब बाभुल, केरल, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काले तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णु क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलांची बीजबँक तयार केल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत असला तरी बॅकेतील बिया कुणाच्या घशातून गिळाल्या असा सवाल टेकड्यांकडे पाहून उठत आहे.

५० लाखाचा चुराडा; हे आहेत जबाबदार

औरंगाबाद जिल्ह्यात देखील झकास पठार तयार करण्याच्या प्रकल्पासाठी स्थायी समितीच्या सभेत २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तलाठी, केंद्रप्रमुख, पर्यावरण, वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, कृषी विभागाचे अधिकारी, आदींच्या एका कार्यशाळेवर हजारो रूपयांचा चुराडा करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात सारोळा, भेंडाळा व अजिंठा व्ह्य़ू या तीन ठिकाणी संकलित केलेल्या बीज बॅकेतील २ क्विंटल ३७ किलोंच्या पुष्पबीजांचे रोपण करण्यात आल्याचा दावा प्रशासन करत आहे. कृषी विभागाच्या मदतीने पठारप्रदेशावर नांगरणी आणि सिंचनाची व्यवस्था देखील केल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र सद्य:स्थितीत सप्टेंबरचे दुसरे सत्र उंबरठ्यावर असताना कुठल्याही टेकडीवर बीजांकुर फुटलेले दिसत नाही.परिणामी या प्रकल्पात कोट्यावधीचा घोळ झाल्याचा संशय बळावत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com