शाहगंज घड्याळाची टिकटिक सुरु; हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत...

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहरवासी ज्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शहागंज घड्याळ औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे सुरू करण्यात आला आहे. सोबतच घड्याळाचा घंटा सुद्धा सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहराचे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शहराचे 9 दरवाजे, तटबंदीची भिंत आणि शाहगंज क्लॉक टॉवरची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापासून औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे कार्य सुरू आहे.

Aurangabad
नितीन गडकरी म्हणतात, आता सॅटेलाईटद्वारे होणार टोलवसुली!

शाहगंज क्लॉक टॉवर 1901 ते 1906 ह्या कालावधीत निझाम सरकारद्वारे उभारण्यात आला होता. नंतर 1962 च्या युध्दाचा वेळेस त्याचावर चेतावणी म्हणून घंटा वाजवला जात होता. त्यानंतर विविध महत्त्वाच्या प्रसंगांवर हा घंटा वाजवला जात होता. म्हणून तो जुन्या शहराची ओळखचा अभिन्न अंग झाला होता. तरी कालांतराने शाहगंज क्लॉक टॉवरची इमारत आणि घड्याळ जुने झाल्यामुळे बंद पडले. स्मार्ट सिटी तर्फे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी इंटॅकच्या सल्ल्याने पारंपरिक पद्धतीने शाहगंज क्लॉक टॉवरचे नूतनीकरण केले. परंतु घड्याळासाठी मेकॅनिक उपलब्ध होत नव्हता म्हणून स्मार्ट सिटीकडून याच्यासाठी शोध घेतला असता हैदराबाद येथे रमेश वॉच कॉर्पोरेशन म्हणून एजन्सी भेटली ज्यांनी घड्याळ तयार करून इमारतीत बसवले. त्यानंतर आज गुरुवारी तो घड्याळ सुरू करण्यात आला व घंटा वाजवण्याची सुरुवात झाली. हा घंटा सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत प्रत्येक तासाला वाजणार. शाहगंज क्लॉक टॉवरच्या दुरुस्तीसाठी 29 लाख रुपये आणि घड्याळ व घंटा बसवण्यासाठी 3.6 लाख रुपये स्मार्ट सिटीच्या निधीतून वापरण्यात आले आहेत.

Aurangabad
प्रदूषणमुक्त मुंबईसाठी 'ती' यंत्रे बसवणार; ६ कोटींचे टेंडर

यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. याच्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत हर घर तिरंगा मोहिमेत शहागंज क्लॉक टॉवर व अन्य दरवाजांची रोषणाई करण्यात येईल, असे बक्षी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com