स्पाॅट पंचनामा : अडीच कोटींच्या शिवसृष्टीत निकृष्ट साहित्याचा वापर

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील क्रांती चौक उड्डाणपुलाखाली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत साकार होत असलेल्या शिवसृष्टी स्मारकातील बांधकामात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचे 'टेंडरनामाच्या' पाहणीत समोर आले आले. या बांधकामांची आयआयटीच्या वतीने सखोल चौकशी केल्यास संबंधित कंत्राटदार, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अभियंते, अधिकारी व प्रकल्प सल्लागार समितीच्या वास्तू विशारदांसह याकामाचे त्रयस्त समिती म्हणून काम पाहणाऱ्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांचे बिंग फुटणारच याची शक्यता नाकारता येत नसल्याचे दिसत आहे.

Aurangabad
खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीचे टेस्टिंग; 'या' तंत्रज्ञानाचा वापर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, औरंगाबादेतील क्रांती चौक उड्डाणपुलाखाली सध्या शिवसृष्टीचे काम सुरू झाले आहे. क्रांती चौक हा शहराचा मध्यवर्ती भाग येतो. याच चौकात गत काही महिन्यापूर्वी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. त्यासोबतच शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन व्हावे, या उद्देशाने पुलाखाली पुतळ्य्याच्या दोन्ही बाजुनेव शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनामधील महत्त्वाचे क्षण, घटना या डिजिटल चित्र, रिप्लिका आणि म्यूरल्सच्या माध्यमातून उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीही यात साकारल्या जाणार आहेत.

Aurangabad
सत्ताबदल होताच बुलेट ट्रेनचे टेंडर सुसाट; साडेचार वर्षांतच...

क्रांतीचौकाच्या मधोमध राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि दोन्ही बाजूंनी पुलाखाली शिवसृष्टी तयार केल्यानंतर या परिसराचे सौंदर्य खुलून दिसावे. तसेच शिवसृष्टी पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येतील, या उद्देशाने महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ आस्तीककुमार पाण्डेय यांनी या प्रकल्पाचे नियोजन केले. यातील बांधकामावर दीड कोटी आणि म्युरल्स तसेच विद्युतीकरण आणि सुशोभिकरणावर तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांचा खर्च केला जात असून, हा निधी स्मार्ट सिटी योजनेतून उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी औरंगाबादेतील अजय ठाकुर या वास्तुविशारदामार्फत २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार केला गेला. त्यानंतर औरंगाबादेतीलच मुजीब रहेमानखान कन्सट्रक्शन कंपनीला सहा महिन्यापूर्वी याकामाचा ठेका देण्यात आला होता. या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीचा प्रकल्प व्यवस्थापक इंजि. इम्रानखान याच्यावर सोपविण्यात आली आहे.

Aurangabad
औरंगाबाद महापालिकेतील अधिकाऱ्यांचा प्रताप; खड्ड्यात मातीचे डोंगर

अभियंते, अधिकाऱ्यांची मिलिभगत

परंतु या शिवसृष्टीची उभारणी करताना संबंधित कंत्राटदार शेख मुजीब रहेमानखान याने स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकारी व अभियंता तसेच प्रकल्प सल्लागार समिती तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तपासणी पथकाशी संगनमत करून शिवसृष्टीच्या बांधकामात अत्यंत निकृष्ठ दर्जाच्या साहित्याचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

कोण पितो वाळू सिमेंटचे पाणी?

यामध्ये निकृष्ट विटा, जुने गट्टू व डस्ट, नाममात्र सिमेंट, काही मातीमिश्रित नाल्यांची रेती, गिट्टीचा वापर होत आहे. सदर बांधकाम सुरू असताना त्यावर क्युरिंग देखील केली जात नसल्याने काही ठिकाणी बांधकाम फुटले आहे. या शिवसृष्टीच्ये बांधकामात रेती आणि सिमेंटचा कमी वापर करून राखमिश्रित क्रशचा अधिकाधिक वापर केला जात आहे. त्यामुळे कोण पितो वाळु सिमेंटचे पाणी आणि कोण खातो गिट्टी आणि विटांची टक्केवारी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Aurangabad
औरंगाबाद बसस्थानकाला खड्ड्यातून बाहेर काढणारा आहे का कोण?

टक्केवारीमुळेच निकृष्ट काम?

अभियंते आणि काही लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीमुळे या ऐतिहासिक प्रतिकृतींच्या चांगल्या प्रकल्पाच्या कामांला निकृष्टेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे संबंधित स्मार्ट सिटी प्रकल्पातील बांधकाम विभागाचे संबंधित कनिष्ठ व वरिष्ठ अभियंते, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार कंत्राटदार व काही लोकप्रतिनिधी यांच्यासोबत संगनमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाचा वापर करत आतापर्यंत या बोगस कामाचे २५ लाखाचे बिल काढण्याचा गोरखधंदा टेंडरनामा तपासात समोर आला आहे.

आयआयटी मार्फत चौकशी व्हावी

त्यामुळे या शिवसृष्टीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून इस्टिमेटनुसार काम करण्यात येत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता आयआयटी मार्फत तपासून सखोल चौकशी करावी आणि कायदेशीर कारवाई व्हावी असा निष्कर्ष याकामाच्या पाहणी दरम्यान निघत आहे. जेणेकरून शिवसृष्टीच्या या निकृष्ट बांधकामात होत असलेला भ्रष्टाचार थांबेल.

काय म्हणतो ठेकेदार

अंदाजपत्रकातील शेड्युल आणि मानकाप्रमाणेच काम आहे. प्रत्येक बांधकाम साहित्याचा दर्जा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत तपासूनच पुढील कामासाठी परवानगी मिळते. कामात कुठेही निकृष्ट साहित्याचा वापर केला जात नाही. ग्रेनाईट फुटलेले नसुन कापलेले आहे. जुन्या गट्टूचा वापर तेथे केला जात नाहीऐ. पुलाखाली होत असलेल्या कामामाघे वाचमनची रूम होती. ते गट्टू तिथुन काढुन खामनदीवर नेणार आहोत. क्युरिंग देखील प्राॅपर होत आहे.

- मुजीब रहेमान खान, ठेकेदार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com