नागपुरात ZP सदस्य अन् ठेकेदार भिडले; या कारणामुळे बाचाबाची...

नागपुरात ZP सदस्य अन् ठेकेदार भिडले; या कारणामुळे बाचाबाची...
Published on

नागपूर (Nagpur) : टेंडरमध्ये (Tender) अडथळे आणत असल्याने एका ठेकेदाराने (Contractor) जिल्हा परिषद सदस्य असलेल्या महिलेस शिवीगाळ केल्याने नागपूर जिल्हा परिषदेत (Nagpur Z P) सदस्य आणि ठेकेदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. याप्रकरणी झेडपी सदस्यांनी संबंधित ठेकेदाराची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. २४) हा प्रकार घडला.

नागपुरात ZP सदस्य अन् ठेकेदार भिडले; या कारणामुळे बाचाबाची...
डॉ. खेमणार कारवाई कराच; ठेकेदार धार्जिणे 'ते' 5 अधिकारी कोण?

जिल्हा परिषदेच्या परिसरातच ही घटना घडली. कंत्राटादारने शिवीगाळ केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य धावून गेले. त्यानंतर सदस्य व ठेकेदारांमध्ये या विषयावरून चांगलाच वाद निर्माण झाला. नंतर प्रकारण हातघाईवर आले. एका सदस्याने ठेकेदाराला धक्काबुक्की केली. त्यानेही जशास तसेच प्रत्युत्तर दिले. प्रकरण चिघळत असल्याचे बघून इतर सदस्यांनी त्यात मध्यस्थी केली. मात्र यामुळे काही वेळासाठी वातावरण चांगलेच तापले होते. या हातघाईची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत पसरली होती. याप्रकरणी सदस्यांनी संबंधित कंत्राटदाराची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्याचे सांगण्यात येते.

Tendernama
www.tendernama.com