नागपुरातील 'आपली बस'ची देखरेख करणारी नवी कंपनी कोणाच्या मालकीची?

Aapli Bus
Aapli BusTendernama

नागपूर (Nagpur) : गेल्या दोन महिन्यांत महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) परिवहन सेवेतील 'आपली बस' (Aapli Bus) अशी ओळख असलेल्या तीन बस गाड्यांना आग लागली. या तिन्ही घटनांत इंजिनजवळ आग लागणे, प्रवाशांना कुठलीही इजा न होणे व इतरही साम्‍य दिसून येत आहे. याशिवाय बसला आग लागल्याची तिसरी घटना घडली त्याच्या सहा दिवस आधीच महापालिकेने अविसा कंपनीला गाड्यांची देखरेख व उत्पन्न वाढीबाबत प्रायोगिक तत्वावर काम करण्याचे कार्यादेशही दिले. विशेष म्हणजे हे कार्यादेश देताना महापालिकेने कमालीची गुप्तता बाळगली. त्यामुळे महापालिकेत देखरेखीसाठी अस्तित्वातील सध्याच्या कंपनीला बाहेर करणे व नव्या कंपनीचा मार्ग सुकर करण्यासाठी षडयंत्राची तर आग नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

Aapli Bus
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

८ मार्चला गिट्टीखदान येथे आपली बसच्या ताफ्यातील एमएच ३१ सीए ६१०२ क्रमांकाची बस जळाली. या बसमधील ५५ प्रवाशांचा जीव वाचला. ३१ मार्चला सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल चौकातील संगम हॉटेलजवळ एमएच ३१ एससी ०४१३ क्रमांकाच्या बसला आग लागली. यातून ४५ प्रवाशांचा जीव वाचला, तर गुरुवारी संविधान चौकात बसला लागलेल्या आगीतून ३५ प्रवासी बचावले. विशेष म्हणजे बसला लागलेल्या आगीची वेळ सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यानची आहे. याशिवाय तिन्ही बसला आग लागली, त्यावेळी चालकाजवळील इंजिनमधून धूर बाहेर आला. तिन्ही घटनांत चालकाने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

Aapli Bus
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

आगीच्या दोन घटना घडल्यानंतर व तिसऱ्या बसला आग लागण्याच्या सहा दिवसआधी अर्थात २८ एप्रिलला महापालिकेने बसची देखरेख व उत्पन्न वाढीसाठी अविसा ग्रुप या कंपनीला प्रायोगिक तत्वावर काम करण्याचे कार्यादेश दिले. विशेष म्हणजे या कंपनीला कार्यादेश देताना महापालिकेने कमालीची गुप्तता बाळगली आहे. या कार्यादेशाबाबत परिवहन विभागातील कर्मचारीही अनभिज्ञ दिसून आले.

Aapli Bus
नाव ठेवायचे तेव्हा ठेवा!163 कोटी खर्चून उभारलेल्या पुलावरुन वाहतूक

सध्या दिल्ली येथील डिम्स या कंपनीकडे उत्पन्न वाढविणे, बसेसवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. या कंपनीचे कंत्राट २२ डिसेंबरपर्यंत आहे. परंतु बसची दुरुस्ती, बस रस्त्यावर धावण्यायोग्य आहे की नाही, ही जबाबदारी संबंधित तिन्ही ऑपरेटर कंपनीची आहे. परंतु गेल्या तीन घटनांमुळे ऑपरेटरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. डिम्स कंपनीला महापालिकेबाहेर करण्यासाठी तसेच नव्या कंपनीला रेडकार्पेट टाकण्यासाठी जाणीवपूर्वक बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात तर टाकला जात नाही ना, असा प्रश्न महापालिका वर्तुळात चर्चेत आहे.

Aapli Bus
'या' कारणामुळे झोपडपट्टीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईना?

गोपनीयता बाळगण्याची अट
अविसा ग्रुप कंपनीला कार्यादेश देताना महापालिकेने काही अटी घातल्या आहेत. कंपनीने काही कर्मचारी नियुक्त केले असून, त्यांनी याबाबत कुठलीही माहिती कुणालाही देऊ नये, अशी अट महापालिकेने कंपनीला घातली आहे. ही कंपनी 'आपली बस'मधील सध्याचे कर्मचारी, उत्पन्न वाढीचे प्रयत्न, बसचा दर्जा आदीबाबत, तसेच स्वतः यात काय सुधारणा करणार, याबाबतचा अहवाल तयार करणार आहे.

Aapli Bus
'पाणीपुरवठा'चे प्रधान सचिव औरंगाबादेतील अधिकाऱ्यांवर का भडकले?

कंपनी नेमकी कुणाची?
अविसा ग्रुप या कंपनीला काम देण्यात आले. याबाबत कमालीची गुप्तताही बाळगण्यात आली. त्यामुळे महापालिकेत प्रवेशासाठी उत्सूक ही कंपनी शहरातील काही नेत्यांची असल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे महापालिकेने रेड कार्पेट टाकलेल्या कंपनीचे मालक कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Aapli Bus
१२ कोटी बुडवणाऱ्या नागपुरातील 'त्या' डॉक्टरच्या संपत्तीवर टाच

सध्या कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर काम देण्यात आले आहे. दोन महिन्यांसाठी ही कंपनी शहर बस, कर्मचारी आदीचा अभ्यास करणार आहे. याशिवाय उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल, यावरही अभ्यास करणार असून, कंपनीने कामही सुरू केले आहे.

- रविंद्र भेलावे, उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक, नागपूर महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com