Gondia: ...अन्यथा गोंदिया-बिरसी विमानतळावरून विमान उडू देणार नाही!

 Gondia Birsi Airport
Gondia Birsi AirportTendernama

गोंदिया (विदर्भ) : गोंदिया - बिरसी विमानतळाकडे (Gondia - Birsi Airport) 2016 पासूनची 2 कोटी 7 लाख 90 हजार रुपयांची कराची (Tax) थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर थकल्याने गावाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही कर थकबाकी न भरल्यास विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा बिरसीच्या सरपंचांनी दिला आहे. विशेष म्हणजे चालू वर्षीच्या थकीत कराचा विचार केल्यास विमानतळाकडे असलेली एकूण कर थकबाकी 2 कोटी 36 लाख 59 हजार रुपयांवर जात असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.

 Gondia Birsi Airport
Nashik: खूशखबर! 'या' कंपनीची गोवा, नागपूर, अहमदाबाद विमानसेवा सुरू

गोंदिया तालुक्यातील ग्राम बिरसी (विमानतळ) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बिरसी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने 2004मध्ये येथील जमीन अधिग्रहण करत या ठिकाणी विमानतळ तयार केले. त्याच प्रमाणे या ठिकाणी विमान उडविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुद्धा तयार करण्यात आले. मात्र या विमानपत्तन प्राधिकरणाने 2016 ते 2023 या कालावधीमधील 2 कोटी 7 लाख 90 हजार 426 रुपयांचा कर भरला नसल्याने या थकीत करामुळे गावाचा विकास रखडला आहे.

त्याच प्रमाणे थकीत कर भरण्यासंबंधी प्राधिकरणाला पत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता पर्यंतचा कर व चालू वर्षाचा कर येत्या 31 मार्च पर्यंत न भरल्यास बिरसी विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, अशी भूमिका सरपंचांनी मांडली आहे. 

 Gondia Birsi Airport
MSRTC: एसटीचा क्रांतिकारी निर्णय; 5 हजार ई-बसेससाठी निघाले टेंडर

थकीत असलेल्या कराबद्दल अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला मात्र त्याकडेही भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. या संदर्भात जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, गट विकास अधिकार यांच्याशीही पत्रव्यहार केला आहे. लोकप्रतिनिधींनाही निवेदने देण्यात आली आहेत. तरी सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे संतोष सोनावणे (सरपंच ग्रा. पं. बिरसी) व उमेश सिंह पंडेले (उपसरपंच) आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com