Swimming Pool
Swimming PoolTendernama

Bhandara : जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव 4 वर्षांपासून बंद, कारण...

Published on

भंडारा (Bhandara) : लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव अद्यापही बंद आहे. जलतरणपटूंच्या वारंवार मागणीनंतरही या तलावांची उपेक्षा कायम आहे. तर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष घालतील काय, असा प्रश्नही जलतरणपटूंतर्फे विचारला जात आहे.

Swimming Pool
Thane : 600 कोटींच्या रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मॅनेज

भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव आहे. गत चार वर्षांपासून जलतरण तलाव बंद असल्यामुळे हा तलाव काळाच्या पडद्याआड जाणार की काय, अशी दयनीय अवस्था निर्माण करून ठेवण्यात आली आहे. गतवर्षी या तलावाची डागडुजी करण्यात आली होती, परंतु पाण्याअभावी हा तलाव आजही कुलूपबंद आहे. याकडे लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी याकडे लक्ष का देत नाही, असा मुख्य सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Swimming Pool
Mumbai-Pune Express Way : 10 वर्षांसाठी CCTV वर 340 कोटींचा खर्च

क्रीडा महोत्सवातही समावेश नाही

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या क्रीडा प्रकारात जलतरण तलावाअभावी या क्रीडा प्रकाराला क्रीडा महोत्सवात समाविष्ट करण्यात आले नव्हते. तरीही जिल्हा क्रीडा प्रशासन याकडे गांभीयति का बघत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. शासकीय जलतरण तलाव बंद झाल्यामुळे पोहण्याचा सराव करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी प्रशासन जलतरण तलाव बंद ठेवून जनतेची नामुष्की ओढवून घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात लहान व मोठे असे दोन जलतरण तलाव आहेत. या तलावांसाठी एक लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. यापूर्वी बोअरवेलला पाणी नसल्यामुळे नवीन बोअरवेल करण्याची मागणी क्रीडा अधिकायांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे पाण्याची सोय होऊ शकली नाही. परिणामी जलतरण तलाव बंद आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आता संपण्याच्या मार्गावर आहेत. ज्या बालकांना पोहण्याचा सराव करायचा होता, त्यांचा मात्र प्रचंड हिरमोड झाला. आता तर उन्हाळी सुटी संपण्याच्या मार्गावर आहेत.

Tendernama
www.tendernama.com