Nagpur : एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवसेनेने का केले आंदोलन?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेचे भांडेवाडी येथे 1000 मे. टन (-20%) क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण (DFBOOT) या धर्तीवर उभारणी आणि देखभाल दुरूस्ती प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले.

Nitin Gadkari
26/11 Mumbai Attack : मुंबई खरंच सुरक्षित आहे का? सागरी सुरक्षेसाठी...

यावेळी असे घडले की, सर्वांच्या नजरा कार्यक्रमावरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पडल्या. प्रकल्प उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरींसमोर भांडेवाडी डंप मध्ये कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या रॅगपिकर्सना सुसबीडीई कंपनीत नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेनेच्या नेतृत्वात (उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना) रॅगपिकर्सने केली. शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख नितीन तिवारी हे असंख्य रॅगपिकर्स सोबत कार्यक्रमस्थळी पोहचले परंतु पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिले नाही, त्यामुळे काही वेळाकरिता तणावाची स्थिति निर्माण झाली. अखेर काही पीडितांसोबत नितीन तिवारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोर समस्या मांडल्या. गेल्या तीन दशकांपासून भांडेवाडी कचराकोंडी संकुलात काम करणारे रॅगपिकर्स सतत कचरा उचलून आपला उदरनिर्वाह करत आहेत. सुमारे 350 रॅगपिकर्सची कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कचरा वेचुन आपल घर चालवतात. नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्याने कचरा, डंपमध्ये न जाता थेट प्रक्रिया केंद्रात येईल, त्यामुळे कचऱ्यावर अवलंबून असलेले हे लोक कचऱ्याअभावी बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणे हे अत्यंत चांगले पाऊल आहे, परंतु कचऱ्यावर अवलंबून असलेल्या या लोकांचे पुनर्वसन ही काळाची गरज आहे, त्यामुळे या सर्व रॅगपिकर्सला सुसबीडीई ह्या कंपनीत रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मांगणी शिवसेनेकडून करण्यात आली.

Nitin Gadkari
Nagpur : 100 कोटी निधी मिळूनही कासवगतीने का सुरु आहेत तलाव पुनरुज्जीवनाची कामे?

असे असणार प्रकल्प : 

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकरिता M/s. SusBDe  नागपूर महापालिकेकडून कुठलेही टिपिंग शुल्क न घेता स्वखर्चाने प्रकल्पाची उभारणी करणार आहेत. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार M/s. SusBDe यांना देण्यात आले आहेत. बाय-प्रोडक्टच्या विक्रीमधून होणाऱ्या उत्पन्नातून प्रथम रु. 15 लक्ष प्रतिवर्ष मनपाला प्राप्त होणार आहेत. तसेच देखभाल व दुरुस्ती कालावधीत वाढीव रॉयल्टी देण्याबाबत कंपनीने सादर केले आहे. सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून, Dry Fermantation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे. पूर्ण क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी कालावधी मध्ये या जागे व्यतिरिक्त 9 एकर जागा Fresh Waste Prossessing साठी सुद्धा देण्यात आलेली आहे. 18 महिन्याची दिलेल्या कालावधी मध्ये हा प्रकल्पाला पूर्ण होईल. या प्रकल्पात ठिकठिकाणचा कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश करण्यात येणार आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com