एका 'टेंडर'मध्येच केला निवडणुकीचा खर्च; सुधीर मुनगंटीवारांवर कोणी केला आरोप?

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis, Sudhir MungantiwarTendernama

नागपूर (Nagpur) : चंद्रपूर अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कंत्राटदार मेसर्स रणजीत सिंग सलुजा यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत तक्रार केली होती. याच तक्रारीचा आधार घेत उद्धव सेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी ऊर्जा विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले. तसेच चंद्रपूर येथील झालेल्या 62 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये तेथील ठेकेदाराने सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणुकीत पैसे खर्च केला असाही आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. 

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
Nagpur : विविध प्रकल्पांच्या कामांना गती; आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी

उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी म्हटले की, शिवसेनेचा सरकार पाडल्यानंतर गृहखाते, ऊर्जा खाते, हे खाते  सध्या खाण्याच्या कामासाठी वापरले जात आहे. ऊर्जामंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या त्या जिल्ह्याच्या नेत्याला तिथलं पॉवर स्टेशन देऊन टाकलेल आहे. सोबतच त्यांनी चंद्रपुरात 64 कोटी रुपये एकाच कंत्राटदाराला देऊन आणि निवडणुकीच्या खर्च त्याच कंत्राटाने केल्याचा आरोप केला. ऊर्जा खात्यामध्ये ऊर्जा खात्याचे सचिव, संचालक आणि महासंचालक आणि चंद्रपूरचे मुख्य अभियंता यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप सुद्धा त्यांनी लावला. सोबतच त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
Mumbai Nashik Highway News : मुंबई नाशिक सुसाट... पण तूर्तास नाहीच! कारण काय?

आमचे सरकार आल्यावर आम्ही सोडणार नाही : 

उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ता यांनी मोदी सरकार वर आरोपांची झडी लावली. त्यांनी म्हटले की, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. महाराष्ट्राच वाटोळं केलं आहे. भाजप ने फोडून सरकार तयार केले, आणि भ्रष्टाचार करत आहे.  हा भ्रष्टाचाराचा पहिला अंक आहे. पुढे अनेक घोटाळे काढू. सर्व ऊर्जा केंद्रावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

या ठेकेदाराने निवडणुकीत पुरविले पैसे?

चंद्रपूर मधील दलाल हा निवडणूक काळात भाजपच्या उमेदवाराला पैसा पुरवताना पाहण्यात आला. चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार, कोराडी प्रकल्पमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केले की, चंद्रपूर येथील झालेल्या 62 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये तेथील ठेकेदाराने सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणुकीत पैसे खर्च केला असाही आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com