Nagpur : वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Mayo Hospital Nagpur (IGGMCH)Tendernama

नागपूर (Nagpur) : विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोबोटिक सर्जरी युनिट उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याचा लाभ लवकरच रुग्णांना मिळणार आहे आणि रुग्णालयात रोबिटिक यूनिटचे काम सुरु केले जाईल.

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Jalyukta Shivar 2.0 : नाशिक विभागाला 850 गावांचे उद्दिष्ट

मिळालेल्या महितीनुसार, 2017 मध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. फेब्रुवारी 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार होता. मात्र, 'हाफकिन'ने खरेदी प्रक्रिया खूप लांबवली. म्हणून हा मोठा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. त्याची कुणालाही माहिती नव्हती. परंतू आमदार प्रवीण दटके यांनी वेळोवेळी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी मेडिकलमधील रोबोटिक सर्जरी युनिटचा विषय उचलला. रोबोटिक सर्जरी युनिट उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, याबाबत आमदार प्रवीण दटके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचाबद्दल माहिती दिली. 

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Nagpur : एकीकडे सामान खरेदीवर अंकुश तर दुसरीकडे मोफत औषध सुरू

या रोबिटिक यूनिट प्रकल्पाची दखल गेल्या दोन वर्षांपासून आमदार दटके घेत आहेत आणि रोबोटिक सर्जरी युनिट लवकर सुरु करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि आताही त्यांचे प्रयत सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे युनिट स्थापनेची प्रक्रिया ठप्प होती, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे रोबोटिक युनिटचा प्रश्न निकाली निघाल्याची माहिती आमदार प्रवीण दटके यांनी दिली. सोबतच लवकरात लवकर यूनिट सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले आणि विदर्भाच्या रुग्णांसाठी लवकरच रोबिटिक शस्त्रक्रिया यूनिट सुरु करण्याचा त्यांनी विश्वास दाखविला.

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Nagpur : 'मेयो'तील औषधांच्या काळ्याबाजाराची 3 महिन्यांत चौकशी

रोबोटिक युनिटचा खर्च आता 20 कोटींवर

सरकारने 2019 मध्ये मेडिकलमधील रोबोटिक युनिटसाठी 16 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर केला होता. ही रक्कम खनिकर्म विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला प्राप्त झाली. मेडिकलने हा निधी हाफकिन बायोफार्मा कंपनीकडे दिला. मात्र प्रक्रिया रखडल्याने अतिरिक्त 3.50 कोटींचा खर्च वाढला आहे. मेडिकल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांच्याशी संपर्क साधून अतिरिक्त निधीची मागणी केली. पुन्हा खनिकर्म विभागाने वाढीव निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दिल्यानंतर आता मेडिकलमध्ये उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक युनिटची किंमत 20 कोटी 30 लाखांवर गेली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com