Nagpur : पुलावर रस्ता चकाचक अन् पुलाखाली खड्डेच खड्डे

Road
RoadTendernama

नागपूर (Nagpur) : रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्था अजूनही  कोलमडलेली आहे. वाय आकाराच्या पुलावरून वाहतूक सुरू होऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. विशेष बाब म्हणजे 234 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 4 प्रकल्पांपैकी वाय आकाराच्या पूलावरून वाहतूक सुरू होऊन केवळ 3 महिने झाले आहेत.

Road
वर्धा-नांदेड नवीन लाईनचा 'या' पाच जिल्ह्यांना मिळेल फायदा; पहिले स्टेशन झाले सुरु

वर एक चकचकीत पूल आहे, तर खाली डीआरएम कार्यालयासमोर बरेच खड्डे आहेत. एप्रिल महिन्यात या पूलाचे उद्घाटन करण्यात आले. पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी पूलाच्या खालच्या भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पण डांबरीकरण 3 महिन्यांतच पूर्णपणे नष्ट झाले असून मोठे खड्डे तयार झाले आहेत. एलआयसी चौकातून डीआरएम कार्यालय, रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यांमधून जावे लागते. जयस्तंभ चौकातही खड्डे पडले आहेत. रामझुला पुलावरून डीआरएम कार्यालयाकडे वळणारे वाहनचालकही या खड्ड्यांना बळी पडत आहेत.

Road
Nashik : रस्त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी ZP सीईओंचा मोठा निर्णय; आता दोष निवारण कालावधी...

वाहतूक कोंडीच्या परिस्थितीतून सुटका कधी होणार?

रामझुलाचा विस्तारित वाय आकाराचा उड्डाणपूल काहीसा दिलासा देत आहे. असे असतानाही डीआरएम कार्यालय, जयस्तंभ चौक, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका नाही. डीआरएम कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथे हातगाड्यांवर फळे आदी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकात उजवीकडे वळून रामझुल्याकडे जाणारी वाहने आणि एलआयसी चौकातून येणारी वाहने जयस्तंभ चौकासमोर तीनचाकी ऑटोचालकांचा जमाव असल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नसल्यामुळे वाहनचालकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नाही.

Road
'Mumbai-Goa Highway'तील भ्रष्टाचाराची न्यायाधीशामार्फत चौकशी करा; कोणी केली मागणी?

खड्ड्यांमुळे अपघातग्रस्तांचे बळी :

डीआरएम कार्यालयासमोरून रेल्वे स्थानकाकडे वळणारे वाहनचालक खड्ड्यांमुळे चौकात अपघाताला बळी पडत आहेत. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकासमोरील पूल पाडण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आल्याने सीताबर्डी किल्ल्याच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी सुरुच आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com